agriculture news in marathi, water circulation through tankers status, nanded, maharashtra | Agrowon

नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 मे 2019

नांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यतील १२ तालुक्यांतील ८० गावे आणि ६७ वाड्या, तांडे मिळून एकूण १४७ लोकवस्त्यांना १२१ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीपुरवठ्यासाठी ८७९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

नांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यतील १२ तालुक्यांतील ८० गावे आणि ६७ वाड्या, तांडे मिळून एकूण १४७ लोकवस्त्यांना १२१ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीपुरवठ्यासाठी ८७९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांत पाणीटंचाई आहे. परंतु मुखेड, लोहा, नांदेड, कंधार या चार तालुक्यांसह देगलूर, उमरी, भोकर, हदगांव, हिमायतनगर, किनवट, माहूर, नायगाव या १२ तालुक्यांत पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर झाली आहे. या तालुक्यातील ८० गावे आणि ६७ तांडे, वाड्यांवरील ग्रामस्थांना ९ शासकीय आणि ११२ खासगी अशा एकूण १२१ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईवरील उपाययोजनाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांत १८२४ विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित आहेत. त्यापैकी ६८२ गावे आणि ५७ वाड्यांवरील ८७९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

सर्व तालुक्यांत ७६६ नवीन विंधन विहिरी प्रस्तावित आहेत. त्यापैकी ५१८ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून ११ ठिकाणची कामे पूर्ण झाली आहेत. ५०७ ठिकाणी कामे सुरू आहेत. तात्पुरत्या पूरक नळ योजनांचे ९२ पैकी ६३ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. सर्व कामे सुरू आहेत. विशेष नळयोजनांच्या २०९ प्रस्तावांपैकी १९४ प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. एका ठिकाणचे काम 
पूर्ण झाले असून अन्य कामे सुरू आहेत.

इतर बातम्या
कांदा खाणाऱ्यांचा विचार करता, मग...नाशिक : कांद्यातील भाववाढीला आळा घालण्यासाठी...
वर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...
चांद्रयान मोहिमेसाठी निधी देणार ः...आटपाडी ः भारतीय अवकाश संशोधन संस्थेला या पुढच्या...
द्राक्षपंढरीत गोड्या छाटण्यांना सुरवातनाशिक : चालू वर्षीच्या द्राक्ष हंगामाला सुरवात...
अतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...
नुकसानग्रस्त मका उत्पादकांना एकरी २५...परभणी : लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने मका पिकाचे...
शिक्षक, ग्रामसेवकांना नोकरीच्या ठिकाणी...पुणे  : जिल्हा परिषदेकडून नियुक्त करण्यात...
हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...हिंगोली  ः यंदा (२०१९-२०) हिंगोली जिल्ह्यात...
नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही...नगर ः जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही कमीच...
युरियाशिवाय शेती विचार रुजला तरच...नागपूर ः सेंद्रिय शेतीचा विचार गेल्या अनेक...
...अखेर ऊसतोड कामगार महामंडळ स्थापनमुंबई ः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या...
कर्जमुक्तीच्या मागणीसाठी चार गावांमध्ये...परभणी  ः शासनाने केलेली कर्जमाफी फसवी आहे....
सरकारने शेतकऱ्यांना  ५० हजार कोटींची...सातारा   : गेल्या पाच वर्षांत राज्य...
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
नागपूर जिल्हा बॅंक घोटाळा निकाली...नागपूर ः नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील...
शेतकरी कंपन्यांकडून हमीभावाने खरेदीची...पुणे : किमान हमीभाव खरेदीच्या कार्यक्रमात शेतकरी...
राज्यात उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने...
राज्यात नवे जलधोरणपुणे : राज्याच्या जुनाट जलधोरणाला अखेर मूठमाती...
कृषी विभाग उभारणार गाव पातळीवर शेतकरी...नागपूर ः ग्रामपंचायत कार्यालयात कृषी सहायकांकरिता...
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी...सिंधुदुर्ग  ः कर्जमुक्त आणि दुष्काळमुक्त असा...