पुणे विभागात ७५७ टॅंकरव्दारे पाणीपुरवठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : सूर्याचा ताप चांगलाच वाढल्याने तापमानाचा पारा उच्चांकी पातळीवर आहे. उन्हाच्या झळांनी ३८ तालुक्यांतील ६२३ गावे ३ हजार ९५८ वाड्यांच्या घशाला अक्षरश: कोरड पडली आहे. टंचाईग्रस्त भागातील साडेतेरा लाख लोकसंख्या आणि १ लाख ७३ हजार जनावरांची तहान भागविण्यासाठी ७५७ टॅंकर धावत आहेत. पाणीपुरवठा करण्यासाठी ३४० विहिरी आणि विंधन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली. 

तापमानात झालेल्या वाढीमुळे धरणे कोरडी पडू लागली आहेत. यातच उपसा वाढल्याने पिण्याच्या पाण्याचे स्रोत कोरडे पडू लागले आहेत. विभागातील सातारा, पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील ४५ पैकी ३८ तालुके पाणी टंचाईग्रस्त आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात अद्यापही टॅंकर सुरू करावा लागलेला नाही. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक टंचाई असून, तब्बल १९८ गावे १३०५ वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी २२३ टॅंकर सुरू आहेत. सांगली जिल्ह्यातील १७३ गावे १०७१ वाड्यांना १७९ टॅंकरने पाणी पुरविले जात आहे. साताऱ्यातील १६३ गावे ७२२ वाड्यांना १९२ टॅंकरने, तर पुणे जिल्ह्यातील ८९ गावे ८६० वाड्यांमध्ये १६३ टॅंकरने पाणी देण्यात येत आहे. सांगलीच्या जत तालुक्यात सर्वाधिक ८६ गावे ६५० वाड्यांना १०३ टॅंकरने पाणी द्यावे लागत आहे. माण, आटपाडी, सांगोला तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढली आहे. 

विभागातील तब्बल १३ लाख ४७ हजार लोकसंख्या आणि सातारा, सांगली जिल्ह्यातील १ लाख ७३ हजार पशुधनाला टॅंकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई असून, समारे ४ लाख १३ हजार, सांगलीतील सुमारे ३ लाख ५७ हजार, साताऱ्यातील जिल्ह्यातील सुमारे ३ लाख ६ हजार, पुणे जिल्ह्यातील २ लाख ७१ हजार लोकसंख्येला पिण्यासाठी टॅंकरने पाणी द्यावे लागत आहे. सातारा जिल्ह्यातील १ लाख १७ हजार, तर सांगलीतील सुमारे ५६ हजार जनावरांना टॅंकरच्या साहाय्याने पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे.    

विभागातील पाणीटंचाईची जिल्हानिहाय स्थिती
तालुके   गावे   वाड्या  टॅंकर
पुणे  ८९  ८६० १६३
सातारा   १६३ ७२२  १९२
सांगली  १७३  १०७१  १७९
सोलापूर  १९८  १३०५  २२३
एकूण   ६२३   ३९५८ ७५७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com