सातारा जिल्ह्यात २७१ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  : जिल्हा प्रशासनाने टंचाईच्या उपायोजनांना सर्वोच्च प्राधान्‍य दिले असून टंचाईग्रस्त भागात मागणी येईल तेथे चारा छावणी तसेच मागणीनुसार टँकर मंजूर करण्यात येत आहेत. टंचाईच्या निवारणार्थ जिल्हा प्रशासनाकडून २४० गावांतील व ९६८ वाड्यांमधील चार लाख ४२ हजार ४११ नागरिकांना व दोन लाख पाच हजार ६९ जनावरांना २७१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा, फलटण, वाई, पाटण, जावली, महाबळेश्वर, कराड व सातारा या तालुक्यांतील गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये माण तालुक्यातील ७८ गावे व ६१५ वाड्यातील एक लाख ४४ हजार ९८९ नागरिकांना व ६४ हजार ७०० पशुधनाला ११३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्यातील ५३ गावे व १७४ वाड्यांतील ९५ हजार ७१७ नागरिकांना व ४२ हजार ९७६ पशुधनाला ४३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

कोरेगाव तालुक्यातील ३३ गावांतील ४९ हजार ५० नागरिकांना व २२ हजार ५१२ पशुधनाला ३६ टँकरद्वारे, खंडाळा तालुक्यातील तीन गावांमधील एक हजार २४३ नागरिकांना व ५०४ पशुधनाला दोन टँकरद्वारे, फलटण तालुक्यातील ३६ गावांना व १५३ वाड्यांतील एक लाख १५ हजार ५८७  नागरिकांना व ५४ हजार ४३७ पशुधनाला ४० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. वाई तालुक्यातील आठ गावे व चार वाड्यांमधील ६ हजार ३८३ नागरिकांना व सात हजार ५८८ पशुधनाला सात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पाटण तालुक्यातील दोन गावे व सात वाड्यांमधील चार हजार ३८४ नागरिकांना व एक हजार ४२७ पशुधनाला सहा टॅंकरद्वारे, जावली तालुक्यातील ११ गावांतील व नऊ वाड्यांतील ११ हजार २६० नागरिकांना व दोन हजार ८३३ पशुधनाला १३ टँकरद्वारे, महाबळेश्वर तालुक्यातील पाच गावांमधील व एका वाड्यातील तीन हजार ६८८ नागरिकांना व एक हजार ३३८ पशुधनाला तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सातारा तालुक्यातील एक गाव व पाच वाड्यांमधील ८८९ नागरिकांना व ३८५ पशुधनाला दोन टँकरद्वारे तर कराड तालुक्यातील दहा गावांमधील नऊ हजार २२१ नागरिक व सहा हजार ३६९ पशुधनाला सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.  माणमधील ३५, खटावमधील ६० विहिरींचे अधिग्रहण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील एकूण १५१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये माणमधील ३५, खटावमधील ६०, कोरेगावमधील नऊ, खंडाळा तालुक्यातील एक, फलटणमधील सहा, वाईमधील १९, पाटणमधील एक, जावलीमधील १२, महाबळेश्वरमधील पाच, कराडमधील तीन विहिरींचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com