पावसाच्या आगमनानंतरही सातार जिल्ह्यात २८८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  ः जिल्ह्याच्या अनेक भागांना पावसाने झोडपून काढले. मात्र, त्याचा पाणीटंचाईवर कोणताच परिणाम झालेला नाही. टँकरच्या संख्येत नाममात्र घट झाली आहे. सध्या जिल्ह्यातील सर्वच ११ तालुक्यांतील २७० गावे व १०३२ वाड्या-वस्त्यांवर २८८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 

जिल्ह्याच्या अनेक भागांना पावसाने झोडपून काढले, मात्र पाणीटंचाई स्थिती जैसे थे आहे. ही टंचाई कमी होण्यासाठी पाऊस दमदार व सातत्याने होणे गरजेचे आहे. पावसाच्या आगमनानंतरही अजूनही सर्व अकरा तालुक्यांत टँकर सुरू आहेत. सध्या २७० गावे व १०३२ वाड्या-वस्त्यांवरील पाच लाख १३ हजार ७७१ लोकसंख्येस २८८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माण तालुक्यात सर्वाधिक ११६ टॅंकरद्वारे ८२ गावे आणि ६४१ वाड्या-वस्त्यांवरील एक लाख ४६ हजार ९४२ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्‍यात ४८ टँकरद्वारे ६१ गावे व १८४ वाड्या- वस्त्यांवरील एक लाख १५ हजार ३५२ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे.

कोरेगाव तालुक्‍यात ३९ टँकरद्वारे ३३ गावे व एका वाडी-वस्तीवरील ४९ हजार ९२५ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. खंडाळा तालुक्यात चार टँकरद्वारे आठ गावे एका वाडी-वस्तीवरील ६४५६ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. फलटण तालुक्यात ५१ टँकरद्वारे ४८ गावे व १७८ वाड्या- वस्त्यांवरील एक लाख ६२ हजार ६६६ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. वाई तालुक्यात सात टॅंकरद्वारे आठ गावे व चार वाड्या- वस्त्यांवरील सहा हजार ३८३ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे.

पाटण तालुक्यात एका टँकरद्वारे दोन गावांतील १२२० नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. जावली तालुक्यात १० टँकरद्वारे १२ गावे, आठ वाड्या- वस्त्यांवरील १२ हजार ५१० नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. महाबळेश्वर तालुक्यात तीन टँकरद्वारे पाच गावे व एका वाडी- वस्तीवरील २२०७ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. सातारा तालुक्यात एक गाव व पाच वाड्या- वस्त्यांवरील ८८९ नागरिकांना दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. कराड तालुक्यात सात टँकरद्वारे दहा गावांतील ९२२१ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे.    १५५ विहिरींचे अधिग्रहण संरक्षित पाण्यासाठी विहिरींच्या अधिग्रहण संख्येत वाढ होत आहे. सध्या जिल्ह्यात १५५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये माणमधील ३४, खटावमधील ६०, कोरेगावमधील १०, खंडाळामधील एक, फलटणमधील सात, वाईमधील २०, पाटणमधील एक, जावलीमधील १२, महाबळेश्वरमधील सहा, कराडमधील चार विहिरींचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com