agriculture news in Marathi, water conference in Aurangabad, Maharashtra | Agrowon

जलसमस्येच्या आढाव्यासाठी औरंगाबादेत पाणी परिषद

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 ऑगस्ट 2019

भांडवली गुंतवणुकीच्या पिकांमुळे दुष्काळ वाढला. त्यामुळे पीक पद्धतीत बदलाविषयी विचार करावाच लागेल.
- उदय देवळाणकार, सचिव, राज्य कृषिमूल्य आयोग

औरंगाबाद  : मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जलसमस्येवर उपाय शोधण्यासाठी औरंगाबाद येथे शनिवारपासून (ता. २४) पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले. चार चर्चासत्रात जलसमस्येच्या अनुषंगाने काम करणाऱ्या विचारवंतांनी समस्येच्या उपायांच्या अनुषंगाने मांडणी केली. रविवारी (ता. २५) या परिषदेचा समारोप होणार आहे.

औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. रवींद्र सिंघल यांच्या संकल्पनेतून या परिषदेचे आयोजन करण्यात आले. दोन दिवसांच्या या परिषदेच्या उद्घाटनाला डॉ. सिंघल यांच्यासह बीडचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे, कृषिरत्न विजय अण्णा बोराडे, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, उदय देवळाणकर, क्रेडाईचे विजय केडीया, उगमचे जयाजी पाईकराव, राजेश फड, अंकुशराव कदम आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक मधुकरअण्णा वैद्य यांनी केले.

उपस्थितांनी आपले विचार मांडल्यानंतर परिषदेला सुरुवात झाली. पहिल्या चर्चासत्रात कृषी व सिंचन यासाठी पाण्याचा वापर, घरगुती पाण्याचा वापर व कमी पाण्यात शेती या विषयावरील चर्चासत्रात विजयअण्णा बोराडे, उदय देवळानकर, राजेश फड, जयाजी पाईकराव, विजय केडीया यांनी सहभाग नोंदविला. दुसऱ्या सत्रात वृक्ष संवर्धन, जलसंवर्धन व भूजल पातळी या विषयावर अशोक तेजनकर, संतोष जोशी, डॉ. दत्ता देशकर, दिलीप यार्दी, शिवानंद टाकसाळे आदींनी सहभाग नोंदविला.

शनिवारी सायंकाळी होणारे दोन चर्चासत्र व रविवारी होणाऱ्या व्याखानानंतर परिषदेचा समारोप होणार आहे. या परिषदेतून पुढे आलेले विषय राज्य शासनाकडे पाठविले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

प्रतिक्रियानद्यांना पाझर फुटण्यासाठी माणसांच्या हृदयाला पाझर फुटायला हवा. नद्यांची अवस्था आपण अशी का केली हा प्रश्न घेऊन लोकांकडे जावे लागेल.
- जयाजीराव पाईकराव, उगम संस्था

शेतीच्या पाण्याची व्यवस्था झाली तरच उद्योग व शहरांच्या पाण्याची व्यवस्था होईल. त्यासाठी आकाशातून पडणारे पाणी भूगर्भात साठविण्याशिवाय पर्याय नाही.
- विजय केडीया, क्रेडाई

मोठ्या प्रकल्पाचं पाणी शेतीला मिळणार नाही ही खूणगाठ बांधा. जलसाक्षरता नेमकी कुणाला शिकवायची हा प्रश्न आहे. फक्त ऊस पिकाला नाव ठेवून चालणार नाही.
- विजयअण्णा बोराडे, कृषिरत्न

माहिती नसलेल्या विषयावर बोलण्यापेक्षा पाणी विषयावर बोलावं. आजकाल अडाणी या शब्दाचा अर्थ लोकांनी बदलून टाकला.
- अरविंद जगताप, लेखक

शेतीसाठी पाण्याचा स्रोत भूजलातील पाणी सरासरीइतका व त्यापेक्षा जास्त पाणी पडूनही निर्माण होणारी टंचाई पाहता भूस्तराचा विचार करावा लागेल. भूजल क्षेत्रात फक्त सर्वेक्षण न करता संशोधन करावे लागेल.
- अशोक तेजनकर, माजी प्र. कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ

पाणी प्रत्येक सजीवाशी निगडित आहे. पर्यावरण समतोल राखून पाण्याचा विचार करावा. त्यासाठी सृष्टीतील प्रत्येक सजीवाच्या पाण्याचा विचार करावा लागेल. पाण्याची गुणवत्ता, पाण्याचा पुनर्वापर, पाण्याची उत्पादकता या तीन विषयांवर काम व्हावे. त्यासाठी केंद्रबिंदू नेमका कोणता ते ठरवून काम 
व्हावे.
- डॉ. दत्ता देशकर, जल अभ्यासक


इतर बातम्या
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली...नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची...
आगामी हंगामासाठी सोयाबीनचे बियाणे राखून...अकोला  : सोयाबीन पिकाखालील पेरणी...
सांगलीत हळदीच्या उत्पादनात घटसांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर...
चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट...नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे...
'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम...सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच...
औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई...औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे...
लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग...नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी,...
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...
पपई दरांचा नंदुरबारात पुन्हा तिढाशहादा, जि. नंदुरबार  : सध्या मंदी असल्याने...
पीकविमा भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन...अमरावती  ः जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात...
गडचिरोली : 'आयसीएआर'ची काजू पीक...गडचिरोली  ः भात उत्पादक पूर्व विदर्भात...
ऐन फेब्रुवारीतच उन्हाळ्याच्या झळा पुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
वनबंधू योजना सुरू करण्यासाठी केंद्राकडे...नाशिक : आदिवासी विभागाच्या वनबंधू योजनेअंतर्गत १४...
कलाग्रामच्या माध्यमातून बचत गटांसाठी...नाशिक : दिल्ली हाटच्या धर्तीवर नाशिकमध्ये...
मराठवाड्यातील रेशीम प्रकल्पाला ग्रीन...औरंगाबाद : झपाट्याने विस्तारत असलेल्या रेशीम...
ऊस उत्पादकता २५० टनांपर्यंत न्यावीच...पुणे : देशातील ऊस उत्पादकता एकरी शंभर टन...
कर्जमाफीसाठी आकस्मिकता निधीतून दहा हजार...मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने...