Agriculture news in marathi `Water Conservation, Agriculture Department should coordinate for‘ Rohayo ’ | Agrowon

`‘रोहयो’साठी जलसंधारण, कृषी विभागाने समन्वय ठेवावा`

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 सप्टेंबर 2021

सोलापूर ः ‘‘जिथे पाऊस पडतो, तिथले पाणी अडवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा. रोजगार हमी योजनेची कामे करताना मृद व जलसंधारण आणि कृषी या विभागाने समन्वय ठेवावा,’’ अशा सूचना मृद व जलसंधारण, रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी दिल्या.

सोलापूर ः ‘‘जिथे पाऊस पडतो, तिथले पाणी अडवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा. रोजगार हमी योजनेची कामे करताना मृद व जलसंधारण आणि कृषी या विभागाने समन्वय ठेवावा,’’ अशा सूचना मृद व जलसंधारण, रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी दिल्या.

जिल्हा प्रशासनाच्या नियोजन भवनमध्ये त्यांनी रोहयो, जलसंधारण विभागाची आणि ‘हर खेत को पाणी योजना’ची आढावा बैठक घेतली. या वेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अधीक्षक अभियंता तथा प्रादेशिक जलसंधारण अधिकारी दिलीप प्रक्षाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा जलसंधारण अधिकारी अण्णासाहेब कदम उपस्थित होते.

नंदकुमार म्हणाले, ‘‘जिल्ह्यात मका, सोयाबीन, तूर, मूग, ऊस आणि फळबागा ही पिके घेतली जात आहेत. जास्त उत्पादन मिळणाऱ्या पिकांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. पाटाने पाणी देण्याऐवजी ठिबक सिंचनाद्वारे दिले, तर एकरी ४० टक्के उत्पादन वाढत असल्याचे शेतकऱ्यांना पटवून द्या. प्रत्येक ग्रामपंचायतीत ‘रोहयो’ची कामे व्हावीत. धावपळ टाळण्यासाठी प्रत्येक गावात पाच कामे सेल्फवर ठेवायला हवीत.’’ 

‘‘कोरडवाहू ओळख हद्दपार करून प्रत्येक शेतकऱ्याला वर्षातून तीन पिके घेता यावीत म्हणून प्रत्येकाच्या शेतीला पाणी पुरवण्याचे सूक्ष्म नियोजन करा’’, असेही ते म्हणाले. ‘रोहयो’चे राज्य प्रशिक्षण समन्वयक नीलेश घुगे यांनी लखपती होण्याचा मार्ग सांगितला. ‘रोहयो’च्या राज्य प्रकल्प अधिकारी सायली घाणे यांनी समृद्धी बजेटच्या आधारे प्रत्येक शेताला पाणी देणे शक्य असल्याचे सांगितले.

अकरा गावे निवडणार

शंभरकर म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी शेतात ‘रोहयो’ची कामे करावीत. त्यांना त्याचे पैसे ‘रोहयो’तून मिळतील. हे प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पटवून द्यावे. लवकरच जिल्ह्यातील अकरा गावे निश्चित करून जलसंधारणाच्या कामातून आदर्श गावे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल.’’ या वेळी त्यांनी जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेच्या कामाचाही आढावा घेतला.


इतर बातम्या
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
गुन्हा दाखल करण्याऐवजी पुन्हा चौकशीचा...पुणे ः जलयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली मृद व...
शेतकरी आंदोलन लोकसभा  निवडणुकीपर्यंत...नगर : केंद्रातील भाजप सरकारने ठरविलेल्या...
सोयाबीन कापणीचा दर  एकरी तीन...अकोला : या हंगामात लागवड केलेले कमी कालावधीचे...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासह  दर्जेदार...अमरावती : राजुरा बृहत लघु पाटबंधारे योजनेप्रमाणेच...
पारनेर कारखाना विक्रीतील  दोषींवर...नगर : नगर जिल्ह्यातील पारनेर सहकारी साखर...
वालचंदनगर (जि.पुणे) : लाळ्या खुरकूत...वालचंदनगर, जि. पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून...
सांगली : रब्बीचे पावणे तीन लाख हेक्टरवर...सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह खते,...
खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या ...चंद्रपूर : कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना...
सांगलीतील पूरग्रस्तांच्या  मदतीसाठी...सांगली : जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
जायकवाडीतील उपयुक्‍त पाणीसाठा ७१.३९ टक्...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी...
नांदेडमधील प्रकल्पांत ८२.५७ टक्के...नांदेड : ऑगष्ट-सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला...
नंदुरबार जिल्ह्यात चार साखर कारखाने...जळगाव : खानदेशात उसाची लागवडदेखील बऱ्यापैकी आहे....
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास...सोलापूर ः ‘‘कृषी योजनांचा अधिकाधिक प्रसार करून...
‘‘हतनूर’मधून ३८८ दशलक्ष घनमीटर पाणी...जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९०...