जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणार

जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणार
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणार

अकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी लागणारे गौणखनिज आजूबाजूच्या परिसरातील नदी-नाल्यांमधून उपलब्ध करून घेतले. या बदल्यात नदी-नाल्यांचे खोलीकरण शास्त्रीय पद्धतीने झाल्याने त्याचा फायदा या वर्षी दिसून आला. खामगाव तालुक्यात आजवर झालेल्या पावसामुळे नदी-नाल्यांमध्ये तुडुंब पाणी भरलेले आहे. या पाण्यामुळे आटलेल्या विहिरींचे स्रोत पुनरुज्जीवित झाले आहेत. काही दिवसांपूर्वी जनसरोवर योजनेबाबतची नुकतीच एक जाहिरात देशातील विविध वर्तमानपत्रात प्रकाशित झाल्याने खामगाव पॅटर्न चर्चेत आला आहे.

केंद्रीय रस्ते बांधकाममंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेने व माजी मंत्री (कै) पांडुरंग फुंडकर संकल्पनेतून हा खामगाव पॅटर्न तयार झाला आहे. खामगाव विधानसभा क्षेत्रात चार राष्ट्रीय महामार्गांचे काम प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पांच्या बांधकामासाठी २७ तलाव व १२ नद्या-नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले. या भागातील बोर्डी, मस, तोरणा, ज्ञानगंगा, बिल्डी अशा विविध नद्यांचे उत्खनन झाले. यातून ३० लाख ७५ हजार घन मीटर गौणखनिज काढण्यात आले. यामुळे आता ३०७५ टीसीएम पाणीसाठवण क्षमता वाढली आहे. ५२ गावांना आणि ३८ पाणीपुरवठा योजनांना थेट फायदा झाला आहे. सुमारे १५ हजार विहिरी रिचार्ज झाल्याचा दावा केला जात आहे. खामगाव हा मतदारसंघ शेतकरी आत्महत्याग्रस्त भाग आहे. या तालुक्यातील काही गावे सातत्याने तीव्र पाणी टंचाईला सामोरे जात आहेत.

(कै.) पांडुरंग फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी लागणारे गौणखनिज नदी, नाले, तलावांतून काढून वापरल्यामुळे या भागात जलक्रांती होत आहे.  राज्य शासनाने सहकार्य केल्याने ही कामे करणे शक्य झाले. हा खामगाव पॅटर्न आता देशभर राबविला जाणार आहे.  - आकाश फुंडकर, आमदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com