‘जलयुक्त’मधील ९९ कामांचे भवितव्य अधांतरी; रत्नागिरी जिल्ह्यातील स्थिती

‘जलयुक्त’मधील ९९ कामांचे भवितव्य अधांतरी; रत्नागिरी जिल्ह्यातील स्थिती
‘जलयुक्त’मधील ९९ कामांचे भवितव्य अधांतरी; रत्नागिरी जिल्ह्यातील स्थिती

रत्नागिरी : भाजप सरकारच्या कालावधीत सुरू झालेले जलयुक्त शिवार अभियान गुंडाळण्याची शक्यता आहे. या योजनेतील पूर्ण झालेल्या कामांसाठीची बिले देण्यास निधी उपलब्ध नसल्याने ठेकेदारांना फटका बसण्याची भीती आहे. या आराखड्यातील ९९ कामे अपूर्ण असून त्यांचे भवितव्य अधांतरी आहे. जलयुक्त शिवार अभियानातील तिसऱ्या टप्प्यात १,१९६ कामांना मंजुरी देण्यात आली. त्यातील ३ कामे रद्द केली. चौथ्या टप्प्याचा आराखडा सप्टेंबर २०१८ मध्ये करण्यात आला. निविदा काढण्यासाठी उशीर झाल्यामुळे कामे लांबली. त्यातील प्रस्तावित ६८५ कामांसाठी १० कोटी ७६ लाख ४९ हजार रुपयांच्या आराखड्याला मान्यता मिळाली होती. ३२३ कामे जलसंधारणाची, तर ३६२ कामे फळबाग लागवडीची आहेत. त्यापैकी ५८६ कामे पूर्ण करण्यात आली. ९९ कामे अद्याप शिल्लक आहेत. चौथ्या टप्प्यातील कामे अंतिम टप्प्यात असतानाच डिसेंबरपर्यंत कामे पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. जलयुक्त शिवार योजना गुंडाळण्यात आल्याने रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी शासकीय यंत्रणेची लगबग सुरू असतानाच आता निधीचा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वाधिक कामे कृषी विभागाकडील रखडली आहेत. कृषी विभागाकडील ३७४ कामे पूर्ण झाली आहेत. २९ कामे सुरू असून ६५ कामे अद्याप प्रलंबित आहेत. ग्रामपंचायत पाणी पुरवठा विभागाकडील १२ कामे पूर्ण झाली असून ६० कामे सुरू आहेत. सामाजिक वनीकरणकडील ५ कामे अद्याप शिल्लक आहेत. जिल्हा परिषद कृषी विभागाकडे ६१ कामांचे उद्दिष्ट असताना शंभर टक्के कामांचीपूर्तता झाली आहे. शासनाकडे निधीची मागणी विविध यंत्रणांकडील एकूण ४४७ कामे पूर्ण झाली असून ३ कोटी १७ लाख ७८ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. कृषी विभागाकडील २९ कामे, सामाजिक वनीकरण विभागाकडील ५०, जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत पाणी पुरवठा विभागाकडील ६० मिळून १३९ कामे सुरू होती. ही सर्व कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. एकूणच ठेकेदारांकडून झालेल्या विलंबामुळे कामे रखडली असली तरी प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आता निधीचा प्रश्न उद्भवणार असून त्यासाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com