agriculture news in Marathi, Water conservation will be done for Amravati University | Agrowon

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ साधणार जलसंधारण
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 मे 2019

अमरावती ः दुष्काळ, पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर दोन तलाव, नाला आणि सात शेततळ्यांच्या खोलीकरणाचा प्रस्ताव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने शासनाला दिला आहे. जिल्हा नियोजन समितीमधून याकरिता निधीची मागणी करण्यात आली आहे. 

अमरावती ः दुष्काळ, पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर दोन तलाव, नाला आणि सात शेततळ्यांच्या खोलीकरणाचा प्रस्ताव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने शासनाला दिला आहे. जिल्हा नियोजन समितीमधून याकरिता निधीची मागणी करण्यात आली आहे. 

अमरावती जिल्ह्यात पाणीसंकट गडद झाले आहे. जनसामान्य, विविध शासकीय विभागांसोबतच अमरावती विद्यापीठाला देखील पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यात विद्यापीठ परिसरातील दोन्ही तलावांचे पाणी फेब्रुवारीमध्येच संपत तलाव कोरडे पडले. परिणामी, विद्यापीठ परिसरातील हिरवळ कायम ठेवणे व बागेचे संवर्धन तसेच इतर कामांसाठी पाणी उपलब्धतेचा प्रश्‍न निर्माण झाला. दोन महिन्यांपासून ही आव्हानात्मकस्थिती आहे. तलावात पाणी नसल्याने विद्यापीठ परिसरातील पक्षी व जनावरांना देखील तृष्णा भागविण्यात अडचण आहे. दरवर्षी मे अखेरपर्यंत तलावात पाणीसाठा राहतो. यंदा मात्र पाण्यासंदर्भात फारच विपरीत परिस्थिती विद्यापीठासमोर निर्माण झाली आहे. जुन्या दोन विहिरी असून, त्यातील पाण्याचा वापर उद्यान विभागासाठी करण्यात येत आहे. मात्र, या विहिरींनी देखील तळ गाठला. त्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाने सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यावर यापुढे भर देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या विविध विभागांत दरदिवशी ४ ते ५ लाख लिटर पाण्याचा वापर होतो. या पाण्यावर ट्रिटमेंट करून त्याचा उद्यान विभागासाठी वापर केला जाईल. रेन वॉटर हार्वेस्‍टिंग आणि पावसाचे वाहून जाणारे पाणी साठविण्यासाठी कोल्हापुरी बंधाऱ्यांची निर्मिती केली जाणार आहे. 

जलसंधारण समितीचे गठण
विद्यापीठात दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर जलसंधारण समितीचे गठण करण्यात आले आहे. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेत ही समिती आहे. समितीत जलतज्ज्ञ खानापूरकर, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता बांबल, पाणीपुरवठा विभागाचे मावळे, विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता शशीकांत रोडे यांचा समावेश आहे.

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलाच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ...मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या...
शेतकऱ्यांना अनुदानावर सेफ्टी किटचा...यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका...इंग्लंडमध्ये लाळ्या खुरकुत (एफएमडी), बोव्हाईन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन डोंगर...सिंधुदुर्ग : अतिवृष्टीने खचलेल्या डोंगरांपैकी...
कॉंग्रेसच्या आजपासून ‘महापर्दाफाश' सभा...मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि...
जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी...मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत ...
ड्रायझोनमधील वरुडला ठिबक अनुदानातून...अमरावती  ः सर्वाधिक संत्रा लागवड व...
जलसमस्येवरील उपायांच्या प्रयत्नात...औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यात निर्माण होणाऱ्या...
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...