नगर जिल्ह्यात ७४ गावांमधील पाणी दूषित

नगर जिल्ह्यात ७४ गावांमधील पाणी दूषित
नगर जिल्ह्यात ७४ गावांमधील पाणी दूषित

नगर ः जिल्ह्यातील सुमारे ७४ गावांतील १०२ पाणी नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व वरिष्ठ वैज्ञानिक भूजल सर्वेक्षण यांच्या मासिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

दूषित पाण्याद्वारे विविध प्रकारचे आजार पसरतात. नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व ग्रामपंचायत या दोन विभागांवर जिल्ह्यात स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागानेही याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्‍यक असताना, या दोन्ही सरकारी यंत्रणांच्या चालढकल कारभाराचा फटका ग्रामीण भागातील जनतेला बसत आहे. 

ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना राबविण्यात येतात; मात्र जलस्रोत व पाणीशुद्धीकरणासाठी उपाययोजना करण्यात येत नसल्याने नागरिकांना अशुद्ध पाणी मिळते. अनेक गावांतील लोकांना अशुद्ध पाणी मिळत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. 

पाणीपुरवठा, ग्रामपंचायत विभाग व आरोग्य यंत्रणा यांच्यातील असमन्वय दूषित पाणीपुरवठ्याला कारणीभूत आहे. जिल्ह्यातील सुमारे एक हजार ५२४ ठिकाणचे पाणीनमुने तपासले आहेत. त्यांपैकी १०२ नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये ७४ गावांचा समावेश आहे.

दूषित पाणी असलेली तालुकानिहाय गावे ः पारनेर ः पळसपूर, कऱ्हाळवेढे, डोंगरवाडी, सावरगाव, कसारे, यादववाडी, अळकुटी, पाडळी आळे. अकोले ः कोकणवाडी, बिताका, जायनावाडी, अंबड, उंचखडक बुद्रुक, अकोले, टाकळी. नगर ः इसळक. संगमनेर ः नान्नज, वडझरी बुद्रुक, वडझरी खुर्द, मिरपूर, वडगाव पान, निमज, देवगाव, घारगाव, कौठेकमळेश्‍वर, निळवंडे, करुले. शेवगाव ः आखतवाडे, भावीनिमगाव, जोहरापूर, ताजनापूर, सालवडगाव, खामपिंप्री. पाथर्डी ः तोंडोळी, कोरडगाव, धामणगाव, कारेगाव, चेकेवाडी, चिंचपूर इजदे, अंबिकानगर, चितळी, तिसगाव, मिडसांगवी, जवळवाडी, कासारवाडी. राहुरी ः ब्राह्मणी. जामखेड ः जवळे, खुटेवाडी. श्रीगोंदे ः निंबवी, सारोळे सोमवंशी, कोरेगव्हाण, चिंभळे, लोणी व्यंकनाथ, शिरसगाव, हंगेवाडी, मढेवडगाव, बोरी, भानगाव. कोपरगाव ः कोळगाव थडी, तिळवणी, खिर्डी गणेश. नेवासे ः सोनई, खेडले परमानंद, शिरेगाव, पाचेगाव, बेल्हेकरवाडी. राहाता ः कोऱ्हाळे, वाकडी. श्रीरामपूर ः मांडवे, बेलापूर खुर्द, शिरसगाव, नाऊर, नायगाव, उंदीरगाव.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com