Agriculture news in Marathi, Water contamination in six villages in the district | Page 2 ||| Agrowon

नगर जिल्ह्यात ७४ गावांमधील पाणी दूषित

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

नगर ः जिल्ह्यातील सुमारे ७४ गावांतील १०२ पाणी नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व वरिष्ठ वैज्ञानिक भूजल सर्वेक्षण यांच्या मासिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

दूषित पाण्याद्वारे विविध प्रकारचे आजार पसरतात. नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व ग्रामपंचायत या दोन विभागांवर जिल्ह्यात स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागानेही याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्‍यक असताना, या दोन्ही सरकारी यंत्रणांच्या चालढकल कारभाराचा फटका ग्रामीण भागातील जनतेला बसत आहे. 

नगर ः जिल्ह्यातील सुमारे ७४ गावांतील १०२ पाणी नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व वरिष्ठ वैज्ञानिक भूजल सर्वेक्षण यांच्या मासिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

दूषित पाण्याद्वारे विविध प्रकारचे आजार पसरतात. नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व ग्रामपंचायत या दोन विभागांवर जिल्ह्यात स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागानेही याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्‍यक असताना, या दोन्ही सरकारी यंत्रणांच्या चालढकल कारभाराचा फटका ग्रामीण भागातील जनतेला बसत आहे. 

ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना राबविण्यात येतात; मात्र जलस्रोत व पाणीशुद्धीकरणासाठी उपाययोजना करण्यात येत नसल्याने नागरिकांना अशुद्ध पाणी मिळते. अनेक गावांतील लोकांना अशुद्ध पाणी मिळत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. 

पाणीपुरवठा, ग्रामपंचायत विभाग व आरोग्य यंत्रणा यांच्यातील असमन्वय दूषित पाणीपुरवठ्याला कारणीभूत आहे. जिल्ह्यातील सुमारे एक हजार ५२४ ठिकाणचे पाणीनमुने तपासले आहेत. त्यांपैकी १०२ नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये ७४ गावांचा समावेश आहे.

दूषित पाणी असलेली तालुकानिहाय गावे ः
पारनेर ः पळसपूर, कऱ्हाळवेढे, डोंगरवाडी, सावरगाव, कसारे, यादववाडी, अळकुटी, पाडळी आळे. अकोले ः कोकणवाडी, बिताका, जायनावाडी, अंबड, उंचखडक बुद्रुक, अकोले, टाकळी. नगर ः इसळक. संगमनेर ः नान्नज, वडझरी बुद्रुक, वडझरी खुर्द, मिरपूर, वडगाव पान, निमज, देवगाव, घारगाव, कौठेकमळेश्‍वर, निळवंडे, करुले. शेवगाव ः आखतवाडे, भावीनिमगाव, जोहरापूर, ताजनापूर, सालवडगाव, खामपिंप्री. पाथर्डी ः तोंडोळी, कोरडगाव, धामणगाव, कारेगाव, चेकेवाडी, चिंचपूर इजदे, अंबिकानगर, चितळी, तिसगाव, मिडसांगवी, जवळवाडी, कासारवाडी. राहुरी ः ब्राह्मणी. जामखेड ः जवळे, खुटेवाडी.
श्रीगोंदे ः निंबवी, सारोळे सोमवंशी, कोरेगव्हाण, चिंभळे, लोणी व्यंकनाथ, शिरसगाव, हंगेवाडी, मढेवडगाव, बोरी, भानगाव. कोपरगाव ः कोळगाव थडी, तिळवणी, खिर्डी गणेश. नेवासे ः सोनई, खेडले परमानंद, शिरेगाव, पाचेगाव, बेल्हेकरवाडी.
राहाता ः कोऱ्हाळे, वाकडी. श्रीरामपूर ः मांडवे, बेलापूर खुर्द, शिरसगाव, नाऊर, नायगाव, उंदीरगाव.


इतर ताज्या घडामोडी
वीजबिल माफ करा, अन्यथा असहकार आंदोलन ः...बुलडाणा ः कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे...
बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात जोरदार पाऊसअकोला ः गेल्या २४ तासांपासून वऱ्हाडात पावसाची झड...
नांदुरा तालुक्यातील ‘त्या’ कृषी...बुलडाणा ः या हंगामात चार शेतकऱ्यांच्या नावावर...
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची...रत्नागिरी ः संततधार पावसाने सोमवारी (ता. १०)...
उडीद पिकावर किडींचा हल्लाबोलरोपळे बुद्रूक, जि. सोलापूर : जिल्ह्यात सततच्या...
कीटकनाशकांवरील बंदीचे लिंबूवर्गीय...लिंबूवर्गीय फळबागांमध्ये येणाऱ्या बहुतांश किडी व...
भाज्यांमध्ये ‘३ जी कटिंग’ पद्धतीने अधिक...वनस्पतीच्या तिसऱ्या पिढीतील शाखेपासून रोपे...
जळगावात आले २८०० ते ४२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
सार्वजनिक पैदास कार्यक्रमांचे प्रमाण...फळपिकातील नव्या जातींच्या पैदास कार्यक्रमांचे...
नगरमध्ये पीककर्ज वितरणात जिल्हा बॅंकच...नगर ः नगर जिल्ह्यात खरीप हंगामात आत्तापर्यंत खरीप...
`रानभाज्या खा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा`सोलापूर : माहिती असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या...
वेळीच ओळखा टोमॅटोमधील विकृतीभाजीपाला पिके ही अन्य पिकांच्या तुलनेत नाजूक...
गिरणा नदीवरील बलून बंधारे प्रकल्पाला...जळगाव  : केंद्र सरकारचा प्रायोगीक प्रकल्प...
परभणी जिल्ह्यात ऊस लागवडीत दुपटीने वाढपरभणी  ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ३० हजार...
सहकारी साखर कारखान्यांनी रुग्णालय...कऱ्हाड, जि. सातारा : कोरोनाचे संकट हे अख्या जगावर...
शेतीच्या डेटा विज्ञानाबाबत जागृकतेची...परभणी :  डेटा विज्ञान तसेच कृत्रिम...
कृषी सल्ला (कोकण विभाग)हवामान अंदाज ः मुंबई येथील प्रादेशिक हवामान...
सांगलीत डाळिंब उत्पादक पीकविम्याच्या...सांगली : जिल्ह्यात पाच मंडळांत अतिपावसाने...
खानदेशातील अनेक भागात तुरळक पाऊसजळगाव  ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) अनेक भागात...
रानभाज्यांकडे नागरिकांचा वाढता कलयवतमाळ : जिल्ह्याच्या डोंगररांगा व शेतशिवारात...