खानदेशातील पाणी संकटात वाढ

खानदेशातील पाणी संकटात वाढ
खानदेशातील पाणी संकटात वाढ

जळगाव : खानदेशात पिण्याच्या पाण्याची समस्या गावोगावी वाढत आहे. शिवारात त्यापेक्षाही अधिक भीषण स्थिती आहे. कांदा, केळी आदी पिकांच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची स्थिती आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात मिरचीखाली कमाल क्षेत्र नष्ट होऊन पीक काढून फेकावे लागले आहे. धुळ्यातील पपई पिकालाही पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. १० ते १५ दिवस आधीच पपईचे क्षेत्र रिकामे करावे लागले आहे. तापी काठ वगळता सर्वत्र जलसंकट आहे. सातपुडा पर्वतातील सर्वच प्रकल्प ५० टक्‍क्‍यांपर्यंत भरले. चोपडा, शिरपूर व यावलमध्ये सातपुडा पर्वतालगत जलसंकट वाढल्याने केळी, पपईला फटका बसला आहे. यावल तालुक्‍यातील हंबर्डी, न्हावी व मोर धरणानजकच्या गावांमध्ये केळीखालील सुमारे दीड हजार हेक्‍टर क्षेत्र पाण्याअभावी बाधित झाले आहे. असून, केळीवर रोटाव्हेटर फिरविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.  

पाचोरा, पारोळा, चाळीसगाव, भडगाव, अमळनेर भागांतील सर्वच मध्यम प्रकल्प कोरडेठाक आहेत. हिवरा, अग्नावती प्रकल्पात काहीसा साठा होता. तोदेखील संपण्याच्या स्थितीत आहे. बहुळा, मन्याड, भोकरबारी, अंजनी, बोरी हे प्रकल्प कोरडेठाक पडल्याने या भागातील जलसंकट वाढले आहे. शेतकऱ्यांना सिंचनाच्या स्राेतांसाठी नव्या कूपनलिका खोदाव्या लागत आहेत. विहिरींचे खोलीकरण करून घ्यावे लागत आहे. परंतु जलस्राेत मुबलक प्रमाणात मिळत नसल्याचे चित्र आहे. 

गिरणा, वाघूर, गोमाई, सुसरी नदीकाठी जलसंकट आहे. शहादा तालुक्‍यातही या हंगामात जलसंकट वाढल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. धुळे जिल्ह्यात पांझरा नदीकाठी टंचाई आहे. भाजीपाल्याची शेती संकटात अाहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. कापडणे, न्याहळोद, लामकानी, तामसवाडी भागांतील कांद्याच्या शेतीसमोर जलसंकट बिकट बनल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागेल, अशी स्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com