Agriculture news in marathi Water on crops due to heavy rains in Parbhani, Hingoli | Agrowon

परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर पाणी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस वेचणीच्या अवस्थेत आहे. सतत हलका ते मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे हंगाम वाया जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस वेचणीच्या अवस्थेत आहे. सतत हलका ते मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे हंगाम वाया जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

दरम्यान, रविवारी (ता.२०) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांत परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६३ मंडळांत हलका ते मुसळधार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील दोन आणि हिंगोली जिल्ह्यातील एका मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.

परभणी जिल्ह्यातील ३५ मंडळांत ध्यम ते मुसळधार पाऊस झाला. जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा (७२.८ मिमी) आणि पाथरी (७७ मिमी) या दोन मंडळांत अतिवृष्टी झाली.

परभणी, जिंतूर, सेलू,  मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातील बहुतांश मंडळांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे करपरा, दुधना, इंद्रायणी, पूर्णा नद्या तसेच ओढे, नाल्यांच्या पुराचे पाणी शेतातील पिकांमध्ये शिरले. त्यामुळे पिके आडवी झाली. जिंतूर तालुक्यात करपरा नदी, परभणी तालुक्यात इंद्रायणी नदी, पूर्णा तालुक्यात ओढे, नाले भरले आहेत. पूर्णा नदीच्या पाण्यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर आदीसह भाजीपाला, फळे, पिकांची मोठी हानी झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील २८ मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली, वसमत तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये जोरदार पाऊसझाला. औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. दोन दिवसापूर्वी कुरुंदा, गिरगाव मंडळांत ढगफुटी झाली. त्यामुळे शेकडो हेक्टरवरील सोयाबीन, तूर, कापूस आदी फळे, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले.

मंडळनिहाय पाऊस (मि.मी)

परभणी जिल्हा ः परभणी शहर ५२.५, पेडगाव ४३.८,सावंगी म्हाळसा ७२.८, बामणी ३५,  बोरी ३२.७, कोल्हा ५३.३ पाथरी ७७.३, बाभळगाव ४६, पालम ४३.५, बनवस २७.८, पूर्णा२०.८, ताडकळस ११.४, लिमला ११.४, कात्नेश्वर १२.८.

हिंगोली जिल्हा ःसिरसम ११.३, डिग्रस १९.८, वसमत २९, हट्टा ३६.३, टेंभुर्णी १६.३, औंढानागनाथ ३५.३, येळेगाव १४.८,साळणा १८, जवळा बाजार ७३.३.
 


इतर ताज्या घडामोडी
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यातून मॉन्सून परतीच्या वाटेवर; पाऊस...महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर...
सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरूगोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला...
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...