agriculture news in marathi Water on crops due to leakage of Dhom canal | Agrowon

धोम कालवा गळतीमुळे पिकांवर पाणी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 जानेवारी 2021

सायगाव, जि. सातारा : धोम कालव्यातून नेहमी होत असलेली गळतीमुळे जावळी तालुक्‍यात सायगाव विभागातील सुमारे ४० एकर बागायती क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

सायगाव, जि. सातारा : धोम कालव्यातून नेहमी होत असलेली गळती, कालव्यातील पाणी ओव्हर फ्लो झाल्यामुळे जावळी तालुक्‍यात सायगाव विभागातील सुमारे ४० एकर बागायती क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वेळीच लक्ष दिले नाही, तर कालवा फुटण्याचा 
धोका आहे. 

खर्शी, सायगाव, महामुलकरवाडी या गावांच्या शिवारातून जाणाऱ्या या कालव्याची गेल्या वर्षी दुरुस्ती करून डागडुजी केली होती. पण, मोठ्या प्रमाणात गळती होऊन कालव्यात पाणी आले की आजूबाजूला पिके असणारी शेतजमीन पाण्याने तुडुंब भरली जात आहे. या शेतात दोन-दोन महिने पाणी साचून राहिल्याने शेती निकृष्ट झाली आहे.

जमीन कठीण झाल्याने पेरणीही करता येत नाही. गेल्या दीड महिन्यापासून कालव्यामध्ये सोडण्यात आलेले प्रमाणापेक्षा जास्त पाणी आजूबाजूच्या रस्त्यावर येऊन कालवा फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कालव्यातून पाणी बाहेर पडून शेतीचा परिसर पाण्याने तुडुंब झाला आहे. या पाणी गळतीचा सर्वांत जास्त फटका हा महामुलकरवाडी व रायगावच्या शेतकऱ्यांना 
बसला आहे.

सततच्या पाण्यामुळे शेतात गहू, हरभरा, ज्वारी व इतर बागायती पिके करताना विचार करावा लागतो. कारण, इथून कोणतेही उत्पन्न निघत नाही. संबंधित ठेकेदाराने निकृष्ट केलेल्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांतून होत आहे. नुकसानग्रस्त पिकांची भरपाई द्यावी, अशीही मागणी प्रमोद काकडे, प्रवीण पवार यांनी केली. 

अधिकाऱ्यांना आश्‍वासनाचा विसर

गतवेळी निकृष्ट काम चालू असल्याचे निदर्शनास आले, तेव्हा ग्रामस्थांनी काम थांबविले होते. त्यावेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम पूर्ण करून गळती काढण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, कोणतेही काम न होता वर्षभरात पुन्हा गळती सुरू झाल्याने या कामाला जबाबदार कोण, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. 
 


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...