Agriculture news in Marathi water discharge from ‘Radish’ fixed at twelve thousand cusecs | Agrowon

‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर स्थिर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस काहीसा कमी झाल्याने मुळा धरणाचा विसर्ग दोन दिवसांपासून बारा हजार क्युसेकवर स्थिर ठेवला आहे. दरम्यान पावसाने शेतपिकांचे नुकसान होतच आहे.

नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस काहीसा कमी झाल्याने मुळा धरणाचा विसर्ग दोन दिवसांपासून बारा हजार क्युसेकवर स्थिर ठेवला आहे. दरम्यान पावसाने शेतपिकांचे नुकसान होतच आहे. अनेक भागात सततच्या पावसामुळे जमिनीतून निचरा होत नसलेले पाणी साठवून राहत असल्याने पिके सडली आहे. रविवारी (ता. २०) सायंकाळी कर्जत तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला.

नगर जिल्ह्यातील सर्व धरणे भरली आहेत. सर्वांत मोठ्या असलेल्या मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस सुरू असल्याने चार दिवसांपूर्वी मुळा धरणातून वीस हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात होता. मात्र, दोन दिवसांपासून पाणलोटात पाऊस काहीसा कमी झाल्याने रविवारपासून धरणातील व विसर्ग बारा हजार क्युसेकवर स्थिर ठेवला आहे. मात्र, सलग दहा-बारा दिवसांपासून पाऊस सुरुच असल्याने खरिपातील पिकांचे नुकसान होतच आहे.

सोयाबीन, बाजरी, भुईमूग, कापसासह कांदा रोपांना मोठा फटका बसत आहे. अनेक भागात सततच्या पावसाने शेतीत पाणी साठवून राहत आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने जमिनी चिभडल्या जात असून पिकेही सडू लागली आहेत. प्रशासनाकडून पंचनामे केले जात असल्याचे सांगितले जात असले तरी सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. मात्र, नेमके किती नुकसान झाले याची माहिती मात्र कृषी विभागाकडे नाही.

रविवारी कर्जत तालुक्यातील काही गावांत जोरदार पाऊस झाला. या पावसाने शेतातील पिके वाहून गेली आहेत. सततच्या पावसाने खरिपातील बहुतांश पिके संकटात आली आहेत.


इतर ताज्या घडामोडी
पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाणे राखून...वाशीम : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अवेळी पाऊस...
कांदा बियाण्याचे दर कडाडलेसातारा ः कांद्याचे दर आठ हजारापर्यंत पोचले आहे....
नगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरणनगर : आठ दिवसांपूर्वी वाढ झालेल्या कांद्याच्या...
हळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ...दापोली, जि. रत्नागिरी ः कोकणातील हवामान हळद...
केळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीतनांदेड : चांगल्या पावसामुळे यंदा खरीप हंगाम बहरला...
शाहू कृषी महाविद्यालयाच्या...कोल्हापूर : सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी...
खर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः...औरंगाबाद : महाआघाडी सरकारने राज्यातील अतिवृष्टी,...
परभणी कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे...परभणी ः राज्यातील सर्व कृषी विद्यापीठातील अधिकारी...
पीक नुकसानप्रश्नी शेतकरी संघर्ष समितीचा...परभणी ः परतीच्या मॉन्सून पावसामुळे, धरणातील पाणी...
हापूस विक्री, निर्यातीला प्रोत्साहनपर...रत्नागिरी ः कोकणच्या हापूसला भौगोलिक मानांकन (...
तुरीवरील शेंग पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक...तुरीवरील शेंग पोखरणाऱ्या अळीची अन्य पर्यायी नावे...
सांगलीत गूळ सरासरी ३६३३ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २७)...
गिरणा, हतनूरमधून मिळणार रब्बीसाठी...जळगाव ः जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गिरणा...
खानदेशात कांदा लागवडीवर परिणाम होणारजळगाव ः खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामातील...
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
महाबीजच्या सौर ऊर्जाचलित गोदामाचे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाद्वारे...
बॅलन्सशीट डोळ्यांसमोर ठेवून दिवाळी...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव कारखाना प्रशासनाने...
कृषी अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये ः...अमरावती : मोर्शी तालुक्‍यात जून ते ऑगस्ट या...
नांदेडमधील शेतकऱ्यांचा अतिवृष्टीने...नांदेड : जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात...
नगरमध्ये कापसाची व्यापाऱ्यांकडून अल्प...नगर ः कापसाला पाच हजार आठशे पन्नास रुपयांचा हमीदर...