agriculture news in marathi, water discharge from jayakwadi dam, aurangabad, maharashtra | Agrowon

जायकवाडी प्रकल्पातून ४३ हजार क्युसेक विसर्ग

टीम अॅग्रोवन
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

जायकवाडी, जि. औरंगाबाद   : जायकवाडी प्रकल्पाचे १६ दरवाजे शुक्रवारी (ता. २५) पहाटे तीन वाजेपासून अडीच फुटांनी उघडण्यात आले आहेत. या दरवाजासह जलविद्युत प्रकल्पामधून गोदावरी नदीपात्रात सुमारे ४३ हजार ५०० क्‍युसेकने विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. 

जायकवाडी, जि. औरंगाबाद   : जायकवाडी प्रकल्पाचे १६ दरवाजे शुक्रवारी (ता. २५) पहाटे तीन वाजेपासून अडीच फुटांनी उघडण्यात आले आहेत. या दरवाजासह जलविद्युत प्रकल्पामधून गोदावरी नदीपात्रात सुमारे ४३ हजार ५०० क्‍युसेकने विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. 

नगर, नाशिक जिल्ह्यांतील प्रकल्पांमधून होत असलेल्या विसर्गामुळे जायकवाडी प्रकल्प मराठवाड्यात पाऊस नसतानाही यंदा तुडुंब भरला. मध्यंतरी आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने डाव्या, उजव्या कालव्यासह जलविद्युत प्रकल्प व प्रकल्पाच्या गेटमधून गोदावरीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. आजघडीला जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याचा येवा वाढला आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. २४) जायकवाडी प्रकल्पाचे काही दरवाजे अर्ध्या फुटांनी उघडून गोदावरी पात्रात १६,७६८ क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.

पाण्याचा येवा कायम असल्याने ‘जायकवाडी’तून शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास १६ दरवाजे जवळपास अडीच फुटांनी उघडून त्यामधून ४१ हजार ९२० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. याशिवाय जलविद्युत केंद्रातून १५८९ क्‍युसेक, तर उजव्या कालव्यातून ८०० क्‍युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. हा विसर्ग शुक्रवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत सुरू होता. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या सर्व गावांमधील लोकांनी सतर्क राहण्याच्या व नदीपात्रात न जाण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाकडून देण्यात आल्या आहेत. 


इतर ताज्या घडामोडी
योग्य पद्धतीने करा बटाटा काढणीयंदा बटाटा पिकाची काढणी फेब्रुवारी- मार्च...
मध्य प्रदेशात द्राक्ष लागवडीसाठी ‘...पुणे : मध्य प्रदेशातील बागायतदार शेतकरी आता...
खरबूज लागवड तंत्रज्ञानखरबूज पिकाची लागवड जानेवारी ते मार्च यादरम्यान...
नांदर्खे, खोंडमळीत आधार प्रमाणीकरण,...नंदुरबार  ः महात्मा फुले कर्जमुक्ती...
जळगाव  : आधार प्रमाणीकरण करण्यासाठी...जळगाव  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कांदा दरांवरील दबाव वाढलाजळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
गडहिंग्लजमध्ये यंदा अधिक पाणीसाठागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : गतवर्षीच्या ऑगस्ट...
यवतमाळ जिल्हा बॅंकेकरिता तब्बल ३००...यवतमाळ  ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या...
मोसंबीला खतमात्रा देणे अत्यंत आवश्‍यक...औरंगाबाद : ‘‘मोसंबी पीक हे शेतकऱ्यांची...
उच्च तंत्रज्ञानावर आधारित फुलशेती...नाशिक : मालेगाव तालुक्यातील वडेल येथील कृषी...
नांदेड विभागात साखरेचे २५ लाख क्विंटलवर...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीत १.२६...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीमध्ये...
नाशिक : माथाडींच्या संपामुळे बाजार...नाशिक  : राज्यातील माथाडी कामगारांच्या...
‘भीमा’च्या कामगारांचे पैसे पाच...मोहोळ, जि. सोलापूर : कामगारांच्या खात्यावर ५...
सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून भाजप...मुंबई ः स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव...
करमाळ्यात शुद्ध; पंढरपुरात सर्वांत...सोलापूर : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे ६१५...
शिवस्मारक निविदेत गैरव्यवहार नाही;...मुंबई ः मुंबईजवळच्या अरबी समुद्रात उभारण्यात...
तूर खरेदीसाठी हमी देण्याबाबत मंत्रिमंडळ...मुंबई ः ‘‘राज्यात सध्या ३१७ तूर खरेदी केंद्रे...
पुणे जिल्ह्यात भाजीपाला पिकांकडे...पुणे ः गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पोषक...
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी २६ मार्चला...मुंबई ः राज्यसभेच्या ५५ जागांसाठी येत्या २६ मार्च...