कोयना धरणातून ७८८८ क्‍युसेक विसर्ग

कोयना धरणातून विसर्ग
कोयना धरणातून विसर्ग

सातारा ः कोयना धरणाच्या पाणलोटक्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे मंगळवारी (ता. १७) सायकांळी चार वाजता सहा वक्र दरवाजे दोन फुटांनी उचलून पाणी सोडण्यात आले. या दरवाजातून ५७८८, तर पायथा वीजगृहातून २१००, असा एकूण ७८८८ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणात प्रतिसेकंद ७४ हजार ४८५ क्‍युसेक पाण्याची आवक होत आहे. मंगळवारी सायंकाळी चार वाजता धरणात ७७.६३ टीएमसी पाणीसाठा झाला. सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत धरणातील पाणीसाठ्यात ६.३० टीएमसीने वाढ झाली.

कोयना धरणातील पाणीसाठा नियंत्रित राहण्यासाठी मंगळवारी (ता. १७) सकाळी आठ वाजता पायथा वीजगृहातून २१०० क्‍युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते. त्यानंतर सायकांळी चार वाजता सहा वक्र दरवाजे दोन फुटाने उचलून ५७८८ क्‍युसेक असे एकूण ७८८८ क्‍युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय धरण प्रशासनाने घेतला आहे. कृष्णा व कोयना नदीकाठावरील गावातील ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com