agriculture news in marathi, water discharge starts from gangapur dam, nashik, maharashtra | Agrowon

गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन; विसर्ग पुन्हा सुरू

टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून धरणसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गंगापूर धरणातून बंद करण्यात आलेला पाण्याचा विसर्ग पुन्हा सुरू करण्यासाठी गंगापूर धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गोदावरी नदीपात्रातील पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली आहे. 

नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून धरणसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गंगापूर धरणातून बंद करण्यात आलेला पाण्याचा विसर्ग पुन्हा सुरू करण्यासाठी गंगापूर धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गोदावरी नदीपात्रातील पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली आहे. 

गंगापूर धरणातून विसर्ग बंद करण्यात आला होता, मात्र दारणा, भावलीसह अन्य काही धरणांमधूनही विसर्ग सुरू होता. सध्या जिल्ह्यातील एकूण २४ धरणांपैकी १९ धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्याने हे धरण ९४ टक्के भरले आहे. गंगापूर धरणातून १६११ क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. दारणा धरणातून ४११६ क्युसेकने, तर भावलीतून २०८ क्युसेकने विसर्ग सुरू होता.

नांदूरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीकडे ६ हजार ३८३ क्युसेक वेगाने विसर्ग होत असल्याची माहिती प्रशासनाने दिली. गंगापूर धरणात पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर झाल्याने या ठिकाणी प्रवेशासाठी मनाई असताना पर्यटक येथे प्रवेशासाठी जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांशी वादविवाद करतात. त्यामुळे याठिकाणी मोठा गोंधळ निर्माण होतो. पर्यटकांकडून गैरप्रकार घडू नये म्हणून जलसंपदा विभागाने ही मनाई केली आहे. मात्र पर्यटकांचा धुमाकूळ मनस्ताप ठरत आहे. पोलिस यंत्रणेने या परिस्थितीत लक्ष घालणे गरजेचे झाले आहे. 


इतर ताज्या घडामोडी
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...