agriculture news in marathi, water discharge status, satara, maharashtra | Agrowon

कोयना धरणातून ६७ टीएमसी पाण्याचा विसर्ग
टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑगस्ट 2019

सातारा : या महिन्याच्या सुरवातीपासून मुसळधार पाऊस झाल्याने सर्वच प्रमुख धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामध्ये एकट्या कोयना धरणाच्या दरवाजातून ६७ टीएमसी पाणीसाठा विनावापर सोडण्यात आला आहे. 

सातारा : या महिन्याच्या सुरवातीपासून मुसळधार पाऊस झाल्याने सर्वच प्रमुख धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामध्ये एकट्या कोयना धरणाच्या दरवाजातून ६७ टीएमसी पाणीसाठा विनावापर सोडण्यात आला आहे. 

पूर्वेकडे दुष्काळाशी सामना करणारा माण, खटाव तालुका आणि पश्‍चिमेकडे अतिवृष्टीमुळे पुराशी दोनहात करणारे कऱ्हाड, पाटण तालुके अशा दुहेरी संकटात सातारा जिल्हा अडकला आहे. जिथं पिकतं तिथं विकत नाही... असे म्हणतात ते पाण्याच्या बाबतीतही खरे ठरले आहे. पुराचे विविध धरणांतून वाहून जाणारे पाणी दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेला देता आले नाही. जिल्ह्यातील प्रमुख धरणांतून तब्बल ७७ टीएमसी पाणी वाहून गेले असून, एकट्या कोयनेतील ६७ तर इतर धरणांतील दहा टीएमसी पाण्याचा समावेश आहे.

या वर्षी जुलैमध्ये सुरू झालेल्या पावसाने ऑगस्ट महिन्यातच सरासरीचे विक्रम मोडले आहेत. वर्षिक सरासरीच्या ११२.०७ टक्के पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. त्यामुळे सर्वच नद्या पूररेषेवर वाहू लागल्या. याचा फटका पाटण, कऱ्हाड, सातारा, वाई तालुक्‍यांना बसला.

जिल्हा प्रशासन पूर्वेकडील माण, खटाव आणि फलटण तालुक्‍यात दुष्काळी स्थितीशी तोंड देत होते. तर, पावसाळ्यात पश्‍चिमेकडील कऱ्हाड, पाटण, सातारा, वाई, जावली, महाबळेश्‍वर तालुक्‍यांत अतिवृष्टीशी सामना करावा लागला. एकीकडे अतिवृष्टी होत असताना पूर्वेकडील तालुके दुष्काळाचे चटके सहन करीत होते. कोयना धरणातून पूरस्थितीच्या काळात साधारण ६७ टीएमसी पाणी वाहून गेले. तर इतर धरणांतून दहा टीएमसी असे एकूण ७७ टीएमसी पाणी वाहून गेले. हे पाणी दुष्काळग्रस्त भागात कालव्याव्दारे सोडता आले असते. मात्र, कालव्यांची कामे अपूर्ण असल्याने आणि काही ठिकाणी पाणी उचलून पुढे टाकण्यासाठी असलेल्या पंपगृहांची दुरुस्ती सुरू असल्याने हे पाणी दुष्काळग्रस्त भागाला देता आले नाही. केवळ कण्हेर धरणातून कालव्याव्दारे पाणी माण तालुक्‍यात देण्यात आले आहे. 

प्रमुख धरणांतील उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी) ः कोयना ९४.२०, धोम १०.९७, धोम-बलकवडी ३.६२, कण्हेर ८.९९, उरमोडी ९.३६ तारळी ४.९९, निरा देवघर ११.६३, भाटघर २३.४६, वीर ९.३४.

इतर ताज्या घडामोडी
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
राज्यात लिंबांना प्रतिक्विंटल १५०० ते...सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३...नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा,...
मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरीऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये...
महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची...कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण...बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा...
कृषी संजीवनी प्रकल्पात पाच हेक्टरपर्यंत...मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात...
बदल्यांचा धूमधडाका सुरूचपुणे : राज्यात खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात...
वानच्या पाण्यावर पहिला हक्क शेतकऱ्यांचाअकोला : शेती सिंचनासाठी निर्माण करण्यात आलेल्या...
विमा कंपनी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्यासोलापूर ः पीकविम्याच्या पैशाबाबत सातत्याने...
मक्यावरील लष्करी अळीच्या प्राथमिक...नागपूर : राज्यातील मका पिकावर आलेल्या अमेरिकन...
कृषी विद्यापीठांच्या संशोधन, विकासासाठी...मुंबई ः कृषी विद्यापीठाच्या संशोधन व विकासासाठी...
कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा टक्के...कोल्हापूर : जिल्ह्यात सुमारे पंधरा टक्के...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे : बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात तयार...
जळगावात वांगी १५०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१८...
तुरुंगात गेलेल्यांनी विचारू नये, की...सोलापूर ः ‘‘मी घरच्यांना सांगून आलो आहे, आता...
मराठवाडा दुष्काळमुक्‍तीसाठी सरकारचे...औरंगाबाद : वॉटर ग्रिड, गोदावरीच्या तुटीच्या...