agriculture news in marathi, water distribution issue of mhaisal scheme, sangli, maharashtra | Page 2 ||| Agrowon

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे ‘म्हैसाळ’ सुरू करण्याच्या हालचाली

टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 मार्च 2018
सांगली  ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी (ता. ११) सांगली जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. यामुळे म्हैसाळ योजना सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. म्हैसाळ योजना सुरू करण्याबाबत पाटबंधारे विभागात बैठका घेण्याचे सत्र सुरू आहे. सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी दोनच दिवसांत ही योजना सुरू करून पाणीटंचाई दूर करण्याचे आश्‍वासन दिले आहे.
 
सांगली  ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी (ता. ११) सांगली जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. यामुळे म्हैसाळ योजना सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. म्हैसाळ योजना सुरू करण्याबाबत पाटबंधारे विभागात बैठका घेण्याचे सत्र सुरू आहे. सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी दोनच दिवसांत ही योजना सुरू करून पाणीटंचाई दूर करण्याचे आश्‍वासन दिले आहे.
 
मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांनी ही योजना सुरू करा, अशी मागणी करूनदेखील ही योजना सुरू करण्यासाठी कोणतीच पाऊले उचलली नव्हती. मग मुख्यमंत्री येणार आहेत, आता योजना सुरू केलीच पाहिजे, त्याशिवाय आपलं ‘व्होट बॅंक’ शाबूत राहणार नाही, याची प्रचिती आल्याने योजना सुरू करण्याचा घाट घातला आहे. 
 
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची वीजबिलाची थकीत ३४ कोटी; तर पाणीपट्टी ७१ कोटी अशी एकूण १०५ कोटींच्या घरात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान ही योजना सुरू केली होती. या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ही योजना बंद केली. त्याअगोदर टंचाईच्या काळात ही योजना सुरू होती. यादरम्यानचे वीजबिल शासन भरणार आहे, असे जाहीर केले. मात्र, अद्यापही या योजनेच्या वीजबिलाची रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीकडे वर्ग झाली नव्हती.
 
गेल्या पंधरा दिवसींत साडेपाच कोटी रुपये शासनाने महावितरण कंपनीकडे वर्ग केले. मात्र, ३४ कोटी वीजबिलाच्या पन्नास टक्के म्हणजे १७ कोटी रुपये भरल्याशिवाय ही योजना सुरूच करता येणार नाही, असे महावितरण कंपनीने सांगितले. अशात गेल्या दोन महिन्यांपासून म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील मिरज, कवठेमहांकाळ, जत, आणि तासगाव तालुक्‍याच्या काही भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी म्हैसाळ योजना सुरू करावी, अशी मागणी करत आहेत. मात्र, या योजनेचे थकीत वीजबिल भरल्याशिवाय ही योजना सुरू केली जाणार नाही, असा पवित्रा फडणवीस सरकारने घेतला.
 
अर्थात, पाणीपट्टी वसूल झाल्याशिवाय थकलेले वीजबिल भरता येणारच नाही, हे स्पष्ट होते. त्यामुळे पाटबंधारे विभागाने लाभक्षेत्रातील गावोगावी जात पाणीपट्टी वसुलीची मोहीम राबवली. मात्र, आम्हाला पाणीच मिळाले नाही, तर आम्ही पाणीपट्टी का द्यायची, असा प्रश्‍न उपस्थित केला. 
 
मुख्यमंत्री फडणवीस रविवारी सांगलीत येणार आहेत. सांगलीतील न्यायालयाचे उद्‌घाटन आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यात शेतकरी मेळावा ते घेणार आहेत. सध्या ताकारी आणि टेंभू योजना सुरू आहेत. मात्र, म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू नाही. मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने ही योजना सुरू करण्यासाठी खासदार संजय पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.
 
येत्या दोन दिवसांत ही योजना सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहेत. मात्र, ही योजना सुरू होण्यासाठी वीजबिलाची थकलेली रक्कम १२ कोटी भरल्याशिवाय ही योजना सुरू होणार नाही; परंतु मुख्यमंत्री येणार असल्याने ही रक्कम भरली जाणार का, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. मुळात येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही योजना सुरू ठेवून आपले व्होट बॅंक शाबूत ठेवण्यासाठी घाट घातला असल्याची चर्चा सुरू आहे.
 
मुख्यमंत्री येण्याअगोदर ही योजना सुरू केली जाणार आहे. त्यामुळे या योजनेचे पाणी कवठेमहांकाळ तालुक्‍यापर्यंत जाईल. त्या वेळी आम्ही योजना सुरू केली आहे, असे सांगितले जाईल. मुख्यमंत्री सांगलीतून गेल्यानंतर ही योजना सुरू राहणार का, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
‘कोरोना’ मुळे मुंबईच्या पाहुण्यांची... नगर  ः ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वरचेवर...
पुणे जिल्ह्यतील सर्वच तालुक्यांत ‘...पुणे  : टाळेबंदी शिथील झाल्यानंतर पुणे,...
नाशिक जिल्ह्यात धरणांत यंदा २४ टक्के...नाशिक : जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत...
वाशीम तालुक्यात पीक उत्पादन वाढीसाठी...वाशीम ः या खरीप हंगामात वाशीम तालुक्यात गावनिहाय...
आरफळ योजनेच्या आवर्तनाची मागणीसांगली ः आरफळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू केले...
गडचिरोलीत मका खरेदीसाठी गोदाम उपलब्ध...गडचिरोली ः हमीभावाने मका खरेदीसाठी जिल्हा...
शेण खताची विल्हेवाट न लावल्यास होणार...अमरावती ः गावातील शेणाच्या ढिगामुळे रोगराईचा...
नांदेडमधील खासगी, ग्रामीण बॅंकांची पीक...नांदेड : जिल्ह्यात खरिप पीककर्ज मागणीसाठी मंगळवार...
जळोची येथील जनावरे बाजार उद्यापासून...पुणे   ः ‘कोरोना’मुळे पुणे जिल्ह्यातील...
सीताफळात एकरी एक लाख रुपये उत्पन्न...अकोला : लागवडीच्या नेटक्या व्यवस्थापनातून...
इचलकरंजीतील जनावरे बाजार बंदचइचलकरंजी, जि. कोल्हापूर : येथील वडगांव बाजार...
कोल्हापुरात शेतकऱ्यांचा खतांसाठी झगडा...कोल्हापूर : खरीप हंगाम तोंडावर आला तरी युरियासह...
पुणे जिल्ह्यात ‘कोरोना’वरील...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
निविष्ठांच्या तक्रारी निवारणार्थ...हिंगोली : कोरोना रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी वैयक्तिक...
महाबळेश्वरमधील दुर्गम भागातील...सातारा   ः ‘कोरोना’चा प्रादूर्भाव...
येवल्यात युरियाचा काळाबाजार करणाऱ्यांवर...नाशिक : ऐन खरिपाच्या तोंडावर कृषी...
सोलापुरात जिल्हा परिषदेची सर्वसाधारण...सोलापूर   ः ‘कोरोना’मुळे लॅाकडाऊन...
टोळधाड नियंत्रणासाठी जनजागृती करावी :...पुणे  ः राज्यातील काही भागात टोळधाडीने...
पुणे बाजार समितीतील फळे, भाजीपाला विभाग...पुणे  ः गुलटेकडी परिसरात बाजार समिती...
नाशिकमध्ये शेतीशाळेतील महिला...नाशिक : जिल्ह्यात शेती विस्तार कार्यात उपक्रमाचा...