कारंजालाड, जि.
ताज्या घडामोडी
जायकवाडी प्रकल्पाच्या डावा कालव्यातील विसर्गात वाढ
पैठण, जि. औरंगाबाद : जायकवाडी प्रकल्पाच्या डावा कालव्यातून मंगळवारी (ता. १३) रात्री दहा वाजेपर्यंत ८०० क्युसेकने सुरू असलेला पाण्याचा विसर्ग त्याच रात्री १० ते ११ वाजेपासून १००० क्युसेक करण्यात आला. शिवाय जायकवाडीच्या उजवा कालव्यातून ९०० क्युसेकने, तर जलविद्युत केंद्रातून १५८९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

जायकवाडी प्रकल्पातून सोमवारी (ता. १२) ११ वाजताच्या सुमारास डावा कालव्यातून ४०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. मंगळवारी सकाळी ११ वाजता तो ५०० क्युसेक करण्यात आला. दुपारी १२ वाजता तो ६०० क्युसेकवर नेऊन त्यानंतर सायंकाळी ६ वाजता तो ७०० क्युसेक, रात्री ९ वाजता ८०० क्युसेक, तर त्याच रात्री १० ते ११ वाजेदरम्यान तो १००० क्युसेक करण्यात आला.
बुधवारी (ता. १४) दुपारी १२ वाजता जायकवाडीच्या उजवा कालव्यातून ९०० क्युसेक, डावा कालव्यातून १००० क्युसेक, तर जलविद्युत केंद्रातून १५८९ क्युसेकने पाण्याचा सुरू असलेला विसर्ग दुपारी २ वाजताही कायम होता.
बुधवारी २ वाजता जायकवाडी प्रकल्पाचा एकूण पाणीसाठा २७३१.७९२ दलघमी (९६.४४ टीएमसी), तर जिवंत पाणीसाठा १९९३.६८६ दलघमी (७०.३८ टीएमसी) वर पोचला. जिवंत पाणीसाठ्याच्या तुलनेत ९१.८३ टक्के भरलेल्या जायकवाडी प्रकल्पात बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास १६२९२ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.
- 1 of 582
- ››