Agriculture news in marathi, Water on the hope of excess rain in Nanded district | Agrowon

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने उरलेल्या आशेवर पाणी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021

नांदेड : जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. यात हदगाव, हिमायतनगरसह बिलोली तालुक्यात शिल्लक राहिलेल्या सोयाबीन, कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नांदेड : जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. यात हदगाव, हिमायतनगरसह बिलोली तालुक्यात शिल्लक राहिलेल्या सोयाबीन, कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे कापून ठेवलेले सोयाबीन वाहून गेले. तर, काढणी केलेला शेतमाल भिजला. त्यामुळे शेतकऱ्यांचे पुन्हा मोठे नुकसान झाले. 

सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यातून शेतकरी सावरत असताना शनिवारी (ता.१६) परतीच्या पावसाने हदगाव, हिमायतनगर, माहूर, बिलोली, मुखेड, कंधार, अर्धापूर, उमरी, धर्माबाद आदी तालुक्यांना झोडपून काढले. पावसाचे प्रमाण हदगाव तालुक्यात अधिक राहिले. त्यामुळे निवघा, तळयी, मनाठा, आष्टी, पिंपरखेड, तामसा या सहा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या सोबतच बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी मंडळातही अतिवृष्टी झाली. 

जिल्ह्यातील इतर मंडळातही जोरदार पाऊस झाला. यामुळे मागील अतिवृष्टीत शिल्लक राहिलेल्या सोयाबीनसह कपाशी, तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी कापून ठेवलेले सोयाबीन भिजून गेले. तर काही ठिकाणी काढलेल्या धान्याची नासाडी झाली. यामुळे अडचणीतील शेतकरी सततच्या नुकसानीमुळे धास्तावले आहेत.


इतर बातम्या
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
वीज पुरवठा सुरळीत न केल्यास  ढोरा...शेवगाव, जि. नगर : महावितरणने थकीत वीज बिलासाठी...
सहा हजार शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
मॉन्सूनोत्तर पावसाचा सांगलीत  १२ हजार...सांगली : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष,...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
उचंगी प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के...   कोल्हापूर : आजरा तालुक्यातील उचंगी...
श्रीरामपुरात बिबट्याचे चार तास...श्रीरामपूर, जि. नगर ः श्रीरामपूर शहरातील मोरगे...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करू :...सांगली ः गेल्या काही दिवसापांसून संपूर्ण राज्यात...
क्षारपड जमीन सुधारण्यासाठी  केंद्राचे...कोल्हापूर : क्षारपड जमीन सुधारणा योजनेस केंद्र...
पावसामुळे द्राक्ष बागांचे  दोन हजार...पुणे ः जिल्‍ह्यात गेल्या आठवड्यात १ आणि २ डिसेंबर...
खानदेशात पुन्हा ढगाळ वातावरण कायम जळगाव ः  खानदेशात पावसाळी व ढगाळ वातावरण...
चाळीसगाव (जि.जळगाव) : अवकाळी पावसामुळे...चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव, पाचोरा, भडगाव आदी...
जळगावः अॅग्रोवन व आयसीएल कंपनीतर्फे...जळगाव ः ॲग्रोवन आणि आयसीएल कंपनीच्या संयुक्त...