Agriculture news in Marathi, water issue about agitation i will lead | Agrowon

पाणीप्रश्नावरील आंदोलनाचे नेतृत्व करणार ः अण्णा हजारे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 जून 2019

नगर : ‘कुकडी’सह घोड धरणातील पाणीसाठे वाढविणे गरजेचे आहे. या प्रकल्पातील नेमक्‍या अडचणी काय आहेत, यावर मंथन व्हावे. डिंभे ते माणिकडोह धरणांदरम्यानच्या बोगद्यासाठी पाठपुरावा करीत आहोत. या पाणीप्रश्नी युवकांनी आक्रमक आंदोलन करावे, आपण त्याचे नेतृत्व करू, अशी ग्वाही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली. 

घोड-कुकडी पाटपाणी कृति समितीतर्फे आयोजित पाणी परिषदेत ते बोलत होते. राज्य आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृतिसमितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, आमदार राहुल जगताप यांच्यासह कार्यकर्ते व अधिकारी उपस्थित होते. 

नगर : ‘कुकडी’सह घोड धरणातील पाणीसाठे वाढविणे गरजेचे आहे. या प्रकल्पातील नेमक्‍या अडचणी काय आहेत, यावर मंथन व्हावे. डिंभे ते माणिकडोह धरणांदरम्यानच्या बोगद्यासाठी पाठपुरावा करीत आहोत. या पाणीप्रश्नी युवकांनी आक्रमक आंदोलन करावे, आपण त्याचे नेतृत्व करू, अशी ग्वाही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली. 

घोड-कुकडी पाटपाणी कृति समितीतर्फे आयोजित पाणी परिषदेत ते बोलत होते. राज्य आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृतिसमितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, आमदार राहुल जगताप यांच्यासह कार्यकर्ते व अधिकारी उपस्थित होते. 

हजारे म्हणाले, ‘‘कुकडी-घोड प्रकल्पांच्या नेमक्‍या अडचणी काय आहेत, त्यांचे निवारण कसे करायचे, यावर मंथन झाले पाहिजे. त्यासाठी अशा पाणी परिषदांची गरज आहे. भविष्यात ‘कुकडी'-घोड’च्या पाण्याचे समसमान वाटप होण्यासाठी युवकांनी आक्रमक भूमिका घेण्याची गरज आहे. मला युवकांच्या लढ्याचे नेतृत्व करण्यास आवडेल.’’ 

पोपटराव पवार म्हणाले, ‘‘जगातील शंभरावर देशांसमोर जलसंकट उभे आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात मतदारसंघ तयार झाल्याने, शहरी भागातून जास्त लोकप्रतिनिधी पुढे आले आणि ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होऊ लागले, ही वस्तुस्थिती आहे. शेतीसाठीचे धरणाचे पाणी शहरांत जाऊ लागले. त्यामुळे धरणांतील पाण्याचे ‘ऑडिट’ करण्याची गरज आहे. मतपेटी आणि राजकारणात पर्यावरण व पाण्याचा प्रश्न जटिल बनतोय. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून जनजागृती व्हावी.’’ 

अण्णा हजारे यांनी लक्ष घातल्यामुळे डिंभे- माणिकडोह दरम्यानच्या बोगद्याचा प्रश्न मार्गी लागला. आता पाण्याच्या नियोजनातील नेत्यांचा हस्तक्षेप कमी झाल्यास शेतकऱ्यांना फायद्याचे होईल, असे आमदार जगताप म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...