सावळी मोहितकर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून सोडविला पाणी प्रश्‍न

सावळी मोहितकर, नागपूर ः विहिरीत बोअर केल्याने पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.
सावळी मोहितकर, नागपूर ः विहिरीत बोअर केल्याने पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.

नागपूर ः शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर दरवर्षी भेडसावणाऱ्या पाणी समस्येची दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे या सर्वांवर विसंबून न राहता सामूहिक प्रयत्नातूनच पाणी समस्येवर सावळी मोहितकर ग्रामस्थांनी मात करण्याचा निर्धार केला. त्याकरिता एक लाख रुपयांपेक्षा अधिकची वर्गणी गोळा करण्यात आली. गाव करी ते राव काय करी, असे म्हटले जाते. सावनेर तालुक्‍यातील सावळी (मोहितकर) ग्रामस्थांनी हा वाक्‍प्रचार आपल्या कृतीतून प्रत्यक्षात आणला आहे. सावळीसह खुर्सापार, जोगा, माळेगाव, रायबासा, जटामखोरा, बिळगाव या गावांमधील पाणीप्रश्‍न उन्हाळ्यात अधिक तीव्र होत होता. जिल्हा परिषदेच्या पाणीटंचाई कृती आराखड्यात या गावांचा समावेश आहे. मात्र, अद्यापही प्रशासनाकडून पाणीटंचाई आराखड्यातील उपाययोजना राबविण्यात आल्या नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी या समस्येवर मात करण्याचा निश्‍चय केला. यासाठी सर्वांत आधी सावळीच्या सरपंच व सचिवांकडे बोअरवेलची मागणी करण्यात आली. परंतू त्याच्याही मंजूरीला उशीर झाल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले. यावर मात करण्यासाठी म्हणून सरपंच किसन ढोलेकर, सचिव सातपूते, गावकरी चंदा सरयाम, नंदा मोहितकर, देवका सरयाम, गोविंदा ठोंबरे, डोमा परतेकी, चंक्रधर मोहितकर, मार्कंड घुगल, अरविंद पंचभाई, दामोदर उ उईके सरसावले. घरोघरी जात निधी गोळा करण्यात आला. एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्‍कम जमा झाली. ही रक्‍कम ग्रामपंचायतीला दिल्यावर ग्रामपंचायतने पाणीपुरवठ्याच्या विहिरीत बोअरवेल केले. यामुळे संपूर्ण गावाचा पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.

पाण्यासाठी सबकुछ पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न एैरणीवर आहे. परिणामी, भूजलपातळी घटायला नको म्हणून शेतातील विहिरीचे खोलीकरण न करण्याचा निर्णय सावळी ग्रामस्थांनी घेतला. ग्रामस्थांनी एकदिलाने पाणी समस्येवर मात केल्याने आमदार सुनील केदार यांनी सरपंचांसह ग्रामस्थांचे कौतुक केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com