खानापूर बंधाऱ्यातील पाणी कर्नाटकात पळवण्याचा प्रयत्न

सोलापूर : कर्नाटक सीमेवर असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील खानापूर येथे दोन दिवसांपूर्वी कर्नाटक हद्दीतील नागरिकांनी रात्रीच्या वेळी भीमा नदीवरील बंधाऱ्याची दारे काढून पाणी पळवण्याचा प्रयत्न केला. पण, खानापूरच्या ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात येताच तात्काळ दारे टाकून पुढे पाणी पळवण्याचा प्रयत्न हाणून पाडला.
खानापूर बंधाऱ्यातील पाणी कर्नाटकात पळवण्याचा प्रयत्न
खानापूर बंधाऱ्यातील पाणी कर्नाटकात पळवण्याचा प्रयत्न

सोलापूर : कर्नाटक सीमेवर असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील खानापूर येथे दोन दिवसांपूर्वी कर्नाटक हद्दीतील नागरिकांनी रात्रीच्या वेळी भीमा नदीवरील बंधाऱ्याची दारे काढून पाणी पळवण्याचा प्रयत्न केला. पण, खानापूरच्या ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात येताच तात्काळ दारे टाकून पुढे पाणी पळवण्याचा प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान, कर्नाटकातील या लोकांना शोधून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. 

खानापूर बंधाऱ्यातून गुड्डेवाडी, अंकलगी, खानापूर गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी पुरवठा होतो. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी भीमा नदीत आले आहे. सध्या कोरोना महामारीने भयावह संकट ओढावल आहे. त्यातून कसेबसे या भागातील लोक आणि शेतकरी कामे करत आहेत. पण, दोन दिवसांपूर्वी कर्नाटकातील ३० ते ३५ नागरिक रात्री उशीरा पिकअप टेम्पो व दुचाकीवर आले. लॅाकडाऊनचा फायदा उठवत या भागात कोणी नसल्याचे पाहून बंधाऱ्याची दारे उचलली. तसेच रात्री बराचवेळ हे पाणी पुढे कर्नाटक हद्दीत मोठ्या प्रवाहाने सोडले. 

दरम्यान, ही माहिती कळताच राज्याच्या हद्दीतील गावातील नागरिकांनी एकमेकांना फोनद्वारे ही माहिती दिली. तेव्हा खानापूर आणि अंकलगीतून रात्रीच सुमारे १०० ते १२५ ग्रामस्थ या ठिकाणी जमा झाले. त्यांनी तातडीने त्यांच्याकडील दारे, पोते, खडक टाकून पहाटेपासून दुपारपर्यंत कर्नाटककडे सोडलेले पाणी अडवले.

दरम्यान, कर्नाटक हद्दीतील नागरिकांनी बंधाऱ्याची नेलेली दारे व अन्य मुद्देमाल जप्त करुन संबंधित लोकांना तात्काळ अटक करुन कारवाई करावी, अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी, तहसीलदार अंजली मरोड यांच्याकडे केली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com