Agriculture news in marathi For water of kukadi irrigation project Parnerkar gathered | Agrowon

कुकडीच्या पाण्यासाठी  पारनेरकर एकवटले 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 मे 2021

कुकडीच्या पाण्याबाबत पुणे जिल्ह्यातील नेते मंडळींकडून होणारा अन्याय यापुढे सहन केला जाणार नाही. हक्काचे पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे, पारनेर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी राजकीय पुढाऱ्यांना बाजूला ठेवून न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

निघोज, ता. पारनेर : कुकडीच्या पाण्याबाबत पुणे जिल्ह्यातील नेते मंडळींकडून होणारा अन्याय यापुढे सहन केला जाणार नाही. हक्काचे पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे, यासाठी पारनेर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी राजकीय पुढाऱ्यांना बाजूला ठेवून न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

लाभक्षेत्राच्या प्रमाणात आम्हाला पाणी मिळालेच पाहिजे, यासाठी संघर्ष करण्यासाठी पारनेरच्या शेतकऱ्यांनी आता कंबर कसली आहे. राजकीय पुढाऱ्यांना बाजूला ठेवून लढा उभारून कुकडीचे हक्काचे पाणी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला.

जवळा (ता. पारनेर) येथे पारनेर तालुक्‍यातील कुकडीच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कुकडीच्या पाणी वाटपात सातत्याने अन्याय होत आहे. यापुढे अन्याय सहन न करता हक्काच्या पाण्यासाठी लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

कुकडीचे आवर्तन लागल्याने पारनेर तालुक्‍यातील शेतीपिके धोक्‍यात आली आहेत. तीव्र पाणी टंचाईमुळे कोट्यवधींची शेतीपिके धोक्‍यात आली आहेत. मात्र, कुकडीचे पाणी आता न्यायप्रविष्ठ असल्याने ही पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र, कुकडीच्या पाण्याबाबत पुणे जिल्ह्यातील पुढाऱ्यांकडून नेहमी अन्याय होत आहे. राजकीय साठमारीत पारनेर तालुक्‍यातील शेतकरी नेहमीच वाऱ्यावर सोडले जातात. यामुळे भविष्यातील पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी पारनेरच्या शेतकऱ्यांनी लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तालुक्‍यातील लाभधारक शेतकऱ्यांची एक कमिटी स्थापन करण्यात येणार आहे.

मात्र, कुकडीच्या पाण्याबाबत संघर्ष उभारताना राजकीय जोडे बाजूला ठेवून हा लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीला तालुक्यातील आजी-माजी नेत्यांसह निघोज, जवळा, वाडेगव्हाण, राळेगण थेरपाळ आदी लाभक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते. कुकडीच्या पाणीवाटपाचे नियोजन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कुकडी कालवा सल्लागार समितीवर राजकीय नेते मंडळी असल्याने पारनेरसह नगर जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर नेहमीच अन्याय होतो. हा अन्याय दूर करण्यासाठी कुकडी कालवा सल्लागार समिती बरखास्त करा, अशी मागणी या वेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे यांनी या बैठकीत केली. 


इतर बातम्या
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
अलमट्टीवर आधुनिक रियल टाइम डाटा यंत्रणा...कोल्हापूर : पूरपरस्थितीचा सामना करण्यासाठी...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...
अकलूज नगरपालिकेच्या मागणीसाठी माळशिरसला...सोलापूर : अकलूज येथे नगरपालिका व नातेपुते येथे...
ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून तिवसा शहराला...अमरावती : ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून तिवसा शहरासाठी...
नांदेडमध्ये पीककर्ज वाटप संथ; ... नांदेड : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ११६८ कोटी...
टोमॅटोचे दर उतरले; शेतकरी संतप्तनारायणगाव, जि. पुणे :  जुन्नर कृषी उत्पन्न...
‘एक गाव, एक वाण’साठी कारंजातील नऊ...वाशीम : राज्य शासनाच्या बाळासाहेब ठाकरे कृषी...
‘ताकारी’च्या लाभक्षेत्राची ड्रोनद्वारे...सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या क्षेत्रातील...
खानदेशात पेरण्या रखडत; कमी पावसामुळे...जळगाव : खानदेशात खरिपातील पिकांच्या पेरणीला रखडत...
निम्न दुधना प्रकल्पात वाढली पाण्याची आवकपरतूर, जि. जालना : यंदा पावसाळा सुरू होताच पाऊस...
ब्रह्मगिरी पर्वतावर अवैध उत्खनन;...नाशिक : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या...
उत्तर भारतात मॉन्सूनची प्रगती पुणे : उत्तर भारतात मॉन्सूनला प्रगतीसाठी पोषक...