अकोला : रब्बीसाठी सोडले काटेपूर्णातून पाणी

Water left over for the rabbi from Katepurna
Water left over for the rabbi from Katepurna

अकोला : शेतशिवारातील पिकांसाठी पाटबंधारे विभागाने केलेल्या पाणीपुरवठा नियोजनानुसार रविवारी (ता. १५) पहिल्या टप्प्यातील पाणी सोडण्यात आले. काटेपूर्णा प्रकल्पावरील उन्नई बंधारा खांबोरा येथून मान्यवरांच्या उपस्थित पाणी सोडून या हंगामाला सुरुवात करण्यात आली.

काटेपूर्णा प्रकल्प समितीचे अध्यक्ष मनोज तायडे, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, अन्वीचे उपसरपंच प्रशांत नागे व शेतकरी उपस्थित होते. सिंचन कायदा २००५ व २००६ नुसार कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे यांनी शेतकऱ्यांनी काटकसरीने पाणी वापरून ‘टेल टू हेड’ या संकल्पनेवर भर देऊन पाण्याचा वापर करावा, असे आवाहन केले. या वर्षात जास्तीत जास्त सिंचन करावे, असा संदेश दिला. 

‘‘काटेपूर्णा प्रकल्पावर एकूण ३२ पाणीवापर संस्था असून, आठ हजार ३२५ हेक्टर प्रवाही सिंचनाची मर्यादा आहे. आता पाणीवापर संस्थाच्या चळवळीतून काटेपूर्णा प्रकल्पावरील पीकपध्दतीत मोठा बदल शेतकऱ्यांनी आणला आहे. त्यामुळे सिंचनाची पध्दतसुद्धा बदलली आहे. नवीन तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांनी जोड धरून उपसा सिंचनातून तुषार व ठिबक सिंचनाचा वापर पाणी वापर संस्थेद्वारे प्रकल्पावर केला जात आहे. यामुळे पाण्याची बचत होत आहे.

लाभक्षेत्रातील तसेच लाभक्षेत्राच्या बाहेरील शेतकऱ्यांना सुद्धा चांगला फायदा होत आहे. दिवसेंदिवस ओलित क्षेत्र वाढत आहे’’, असे काटेपूर्णा प्रकल्पाचे अध्यक्ष मनोज तायडे यांनी सांगितले.

सिंचनाचा कोटा कायम ठेवा

प्रकल्पावर मोठ्या प्रमाणावर बिगर सिंचनाचे आरक्षण वाढत आहे. मात्र, या धोरणामुळे शेती सिंचनाचा घात होऊ शकतो. त्यामुळे जलसंपदा विभागाने या विषयाकडे तत्काळ लक्ष केंद्रित करावे, सिंचनाचा शेतकरी कोटा कायम ठेवावा, सिंचनाचे प्रकल्प हे सिंचनाचेच राहावे, अशी मागणी पाणी वापर संस्था व शेतकऱ्यांनी केल्याचेही मनोज तायडे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com