राज्यातील पाणीसाठा ४४ टक्क्यांवर 

राज्यातील अनेक भागांत उन्हाचा चटका वाढला आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. गेल्या वर्षी चांगल्या पावसामुळे राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लहान प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते.
jaykwadi
jaykwadi

पुणे ः राज्यातील अनेक भागांत उन्हाचा चटका वाढला आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. गेल्या वर्षी चांगल्या पावसामुळे राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लहान प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र पाच ते सहा महिन्यांत धरणांतील पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे. सध्या राज्यातील एकूण तीन हजार २६७ प्रकल्पांमध्ये सुमारे ९०९.४५ टीएमसी (२५,७६० दशलक्ष घनमीटर) एवढा म्हणजेच सरासरी ४३.६९ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. 

राज्यात गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पाण्याची टंचाई भासत होती. त्यामुळे पाण्यासाठी शासनाला अनेक ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. गेल्या वर्षी पहिल्याच पाऊस चांगला झाल्यामुळे राज्यातील प्रकल्पामध्ये चांगले पाणी आले होते. तसेच भूजल पातळीत वाढ होऊन विहिरींना आणि बोअरवेलला पाणी आले. मात्र काही भागांत पाण्याचा अति उपसा होत असल्यामुळे फेब्रुवारीपासून अनेक गावामध्ये पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तर काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

गेल्या वर्षी पाण्याची काही प्रमाणात मागणी वाढली होती. त्यामुळे धरणातील पाणीपातळी कमी झाली होती. गेल्या वर्षी याच काळात राज्यातील प्रकल्पामध्ये अवघा ४२.३३ टक्के एवढा पाणीसाठा होता. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. कोकण विभागात ४८.६ टक्के, नागपूर विभागात ४६.७९ टक्के, अमरावती विभागात ४३.५५ टक्के, नाशिक (ठाणे) विभागात ४०.६४ टक्के, तर पुणे विभागात ४०.९७ टक्के पाणीसाठा होता. तर सर्वाधिक पाणीटंचाई भासत असलेल्या औरंगाबाद विभागातील प्रकल्पामध्ये ३९.०८ टक्के पाणीसाठा होता. 

सध्या मोठ्या, मध्यम आणि लहान प्रकल्पामध्ये सर्वाधिक पाणीसाठा ठाणे विभागात झाला आहे. ठाणे विभागात ६७.८३ टीएमसी म्हणजेच ५०.१४ टक्के पाणीसाठा आहे. अमरावती विभागात १०३.६९ टीएमसी म्हणजेच ४८.८५ टक्के, नागपूर विभागात १०७.०२ टीएमसी म्हणजेच ४४.८७ टक्के, नाशिक विभागात १२९.५२ टीएमसी म्हणजेच ४६.९४ टक्के, पुणे विभागात ३१६.०८ टीएमसी म्हणजेच ३८.४४ टक्के, तर औरंगाबाद विभागात १८५.२९ टीएमसी म्हणजेच ४५.२१ टक्के पाणीसाठा आहे.  प्रकल्पनिहाय पाणीसाठा (टीमसीमध्ये) 

प्रकल्प संख्या पाणीसाठा टक्के 
मोठे प्रकल्प १४१ ६८२.५० ४५.२८ 
मध्यम प्रकल्प २५८ १२५.३६ ५३.१२ 
लघू प्रकल्प २८७२ १०१.५८ ३२.६५ 
एकूण ३२६७ ९०९.४५ ४३.६९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com