agriculture news in Marathi water level at 44 percent Maharashtra | Page 2 ||| Agrowon

राज्यातील पाणीसाठा ४४ टक्क्यांवर 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 मे 2021

राज्यातील अनेक भागांत उन्हाचा चटका वाढला आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. गेल्या वर्षी चांगल्या पावसामुळे राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लहान प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते.

पुणे ः राज्यातील अनेक भागांत उन्हाचा चटका वाढला आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. गेल्या वर्षी चांगल्या पावसामुळे राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लहान प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र पाच ते सहा महिन्यांत धरणांतील पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे. सध्या राज्यातील एकूण तीन हजार २६७ प्रकल्पांमध्ये सुमारे ९०९.४५ टीएमसी (२५,७६० दशलक्ष घनमीटर) एवढा म्हणजेच सरासरी ४३.६९ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. 

राज्यात गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पाण्याची टंचाई भासत होती. त्यामुळे पाण्यासाठी शासनाला अनेक ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. गेल्या वर्षी पहिल्याच पाऊस चांगला झाल्यामुळे राज्यातील प्रकल्पामध्ये चांगले पाणी आले होते. तसेच भूजल पातळीत वाढ होऊन विहिरींना आणि बोअरवेलला पाणी आले. मात्र काही भागांत पाण्याचा अति उपसा होत असल्यामुळे फेब्रुवारीपासून अनेक गावामध्ये पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तर काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

गेल्या वर्षी पाण्याची काही प्रमाणात मागणी वाढली होती. त्यामुळे धरणातील पाणीपातळी कमी झाली होती. गेल्या वर्षी याच काळात राज्यातील प्रकल्पामध्ये अवघा ४२.३३ टक्के एवढा पाणीसाठा होता. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. कोकण विभागात ४८.६ टक्के, नागपूर विभागात ४६.७९ टक्के, अमरावती विभागात ४३.५५ टक्के, नाशिक (ठाणे) विभागात ४०.६४ टक्के, तर पुणे विभागात ४०.९७ टक्के पाणीसाठा होता. तर सर्वाधिक पाणीटंचाई भासत असलेल्या औरंगाबाद विभागातील प्रकल्पामध्ये ३९.०८ टक्के पाणीसाठा होता. 

सध्या मोठ्या, मध्यम आणि लहान प्रकल्पामध्ये सर्वाधिक पाणीसाठा ठाणे विभागात झाला आहे. ठाणे विभागात ६७.८३ टीएमसी म्हणजेच ५०.१४ टक्के पाणीसाठा आहे. अमरावती विभागात १०३.६९ टीएमसी म्हणजेच ४८.८५ टक्के, नागपूर विभागात १०७.०२ टीएमसी म्हणजेच ४४.८७ टक्के, नाशिक विभागात १२९.५२ टीएमसी म्हणजेच ४६.९४ टक्के, पुणे विभागात ३१६.०८ टीएमसी म्हणजेच ३८.४४ टक्के, तर औरंगाबाद विभागात १८५.२९ टीएमसी म्हणजेच ४५.२१ टक्के पाणीसाठा आहे. 

प्रकल्पनिहाय पाणीसाठा (टीमसीमध्ये) 

प्रकल्प संख्या पाणीसाठा टक्के 
मोठे प्रकल्प १४१ ६८२.५० ४५.२८ 
मध्यम प्रकल्प २५८ १२५.३६ ५३.१२ 
लघू प्रकल्प २८७२ १०१.५८ ३२.६५ 
एकूण ३२६७ ९०९.४५ ४३.६९

इतर अॅग्रो विशेष
कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा पुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत मॉन्सून...
राज्यात ठिकठिकाणी धुव्वांधार पुणे : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे...
दूध उत्पादकांचे उत्पन्न पोचेल २५...गायी म्हशींमधील लिंग विनिश्‍चित वीर्यमात्रांच्‍या...
धरणक्षेत्रांत पावसाचा जोर पुणे : तीन दिवसांपासून कोकणसह, सह्याद्रीच्या...
सरळ कापूस वाण बियाण्यांचा खानदेशात...जळगाव : खानदेशात केळी पट्ट्यात सरळ वाणांची...
मॉन्सूनची वाटचाल सुरूच पुणे : उत्तर भारतात मॉन्सून दाखल झाल्यानंतर...
कृषी सचिव एकनाथ डवले रमले शिवारात नांदेड : राज्याचे कृषी सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे...
विद्यापीठाच्या कांदा बियाणे विक्रीत ‘...नाशिक/नगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बियाणे...
कृषी पर्यटनातून शेतकऱ्यांना पूरक...पुणे ः सहकार विकास महामंडळाबरोबर झालेल्या...
कोकण, घाटमाथा, विदर्भात अतिवृष्टीचा...पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार...
दूध उत्पादकांना रोज १४ कोटींचा फटका नगर ः लॉककाडउनमुळे दुधाची मागणी घटल्याचे सांगत...
महिला गटाने रुजविले शेती, पूरक...कुशिवडे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि म्हाप्रळ...
डिजिटल सात-बारासाठी ५१ बँकांनी केले...पुणे : शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी डिजिटल...
कांदा बीजोत्पादनात कंपन्याच मालामाल जळगाव : खानदेशात अनेक कांदा बियाणे निर्मात्या...
‘डीएससी’अभावी हजारो कोटी पडून पुणे ः पंधराव्या वित्त आयोगाचा पाच हजार कोटी...
घृष्णेश्‍वर कंपनीची सातत्यपूर्ण उंचावती...एका गटापासून सुरुवात करून विविध उपक्रम, त्यात...
२५ एकरांत शेडनेट्‍स, आदिवासींची सामूहिक...नगर जिल्ह्यात म्हाळुंगी (ता. अकोले) परिसरातील...
विदर्भात पावसाचा जोर पुणे : मॉन्सून उत्तरेकडे सरकत असताना राज्यातील...
लिंबे तोडणीलाही महाग अकोला ः कोरोनामुळे यंदा शेतकऱ्यांना मोठा फटका...
मॉन्सून जोमात, पीककर्ज कोमात पुणे ः दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना...