agriculture news in marathi, water level decrease, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीपातळी झपाट्याने होतेय कमी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 मे 2018
पुणे  ः उन्हाची तीव्रता वाढल्याने धरणातील पाण्याच्या बाप्षीभवनाचा वेग चांगलाच वाढला आहे. धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. यडगाव, वडीवळे, आंद्रा, पानशेत, खडकवासला आणि वीर ही धरणे वगळता बहुतांशी धरणांमध्ये पाणीसाठा चाळीस टक्क्यांहून अधिक खालावला आहे. टेमघर, वरसगाव, नाझरे या धरणातील पाणीसाठा अचल पातळीत गेला आहे
.
पुणे  ः उन्हाची तीव्रता वाढल्याने धरणातील पाण्याच्या बाप्षीभवनाचा वेग चांगलाच वाढला आहे. धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. यडगाव, वडीवळे, आंद्रा, पानशेत, खडकवासला आणि वीर ही धरणे वगळता बहुतांशी धरणांमध्ये पाणीसाठा चाळीस टक्क्यांहून अधिक खालावला आहे. टेमघर, वरसगाव, नाझरे या धरणातील पाणीसाठा अचल पातळीत गेला आहे
.
गेल्या दोन महिन्यांपासून सूर्य चांगलाच तळपत आहे. त्यामुळे उन्हाचा चटकाही वाढला आहे. परिणामी धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होऊ लागले आहे. दुसरीकडे धरणातील पाण्याची मागणीही शहरातील नागरिक व शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 
 
पश्चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, आंबेगाव भागात जवळपास लहान मोठी २३ धरणे आहेत. या धरणातील पाणीपुरवठा पूर्वेकडील, शिरूर, पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना होतो. याशिवाय पुणे व पिंपरी चिंचवड शहरेही या धरणातील पाण्यावर अवलंबून आहे.
 
मात्र, उन्हामुळे शहरातील नागरिकांकडूनही पाण्याची मागणी वाढली आहे. तसेच शेतीसाठीही पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे पिंपळगाव जोगे, माणिकडोह, वडज, डिंभे, घोड, विसापूर, कळमोडी, चासकना, भामा आसखेड, वडीवळे, पवना, कासारसाई, मुळशी, गुंडवणी, नीरा देवघर, भाटघर, या धरणातील पाणीसाठा ४० टक्क्यांहून कमी झाला आहे.
 
तसेच पिंपळगाव जोगे, येडगाव, डिंभे, घोड, चासकमान, वीर धरणातून डाव्या कालव्याला, तर डिंभे, घोड, कळमोडी, खडकवासला, गुंजवणी, वीर धरणातून उजव्या कालव्याला पाणीपुरवठा सुरू आहे. तर कळमोडी, भामा आसखेड, पवना, वरसगाव, खडकवासला, नीरा देवघर धरणातून बंद जलविहिनीद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

धरणनिहाय उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी) ः पिंपळगाव जोगे ०.४८, माणिकडोह ०९२., येडगाव १.६२, वडज ०.२०, डिंभे २.९१, घोड ०.१४, विसापूर ०.२४, कळमोडी ०.३५, चासकमान १.३३, भामा आसखेड २.९२, वडिवळे ०.४८, आंद्रा १.७४, पवना २.९२, कासारसाई ०.१९, मुळशी २.७०, पानशेत ६.४०, खडकवासला १.४७, गुंजवणी ०.९४, नीरा देवघर २.५१, भाटघर ३.५१, वीर ५.६३, नाझरे ०.०६.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...