agriculture news in marathi, water level decrease in small ponds, parbhani, maharashtra | Agrowon

परभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 जुलै 2019

परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला. तरीही अद्याप पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यातील २२ पैकी १३ लघू सिंचन तलावांतील पाणीसाठा अद्याप जोत्याखाली आहे. आठ लघू तलाव अजून कोरडेच आहेत. त्यामुळे अनेक तालुक्यांतील पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. केवळ एका तलावांमध्ये उपयुक्त पाणीसाठा आहे. 

परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला. तरीही अद्याप पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यातील २२ पैकी १३ लघू सिंचन तलावांतील पाणीसाठा अद्याप जोत्याखाली आहे. आठ लघू तलाव अजून कोरडेच आहेत. त्यामुळे अनेक तालुक्यांतील पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. केवळ एका तलावांमध्ये उपयुक्त पाणीसाठा आहे. 

यंदा जिल्ह्यात पावसाचे आगमन उशिरा झाले. आजवर सर्वत्र असमान, अल्प प्रमाणात पाऊस झाला. जिल्ह्यातील २२ लघु सिंचन तलावांच्या पाणलोट क्षेत्रात आजवरच्या पावसाळ्यात जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे पेडगाव (ता. परभणी), आंबेगाव (ता. मानवत), नखातवाडी (ता. सोनपेठ), देवगाव, जोगवाडा, बेलखेडा, वडाळी, चारठाणा (सर्व ता. जिंतूर) हे आठ तलाव कोरडे आहेत. 

झरी (ता. पाथरी), तांदुळवाडी (ता. पालम), राणीसावरगाव, टाकळवाडी, कोद्री, पिंपळदरी (सर्व ता. गंगाखेड), चिंचोली, आडगाव, केहाळ, भोसी, मांडवी, दहेगाव, पाडाळी (सर्व ता. जिंतूर) या लघू तलावांतील पाणीसाठा अजून जोत्याखाली आहे. कवडा येथील तलावामध्ये ०.०६५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. मोठा पाऊस न झाल्यास उपयुक्त पाणीसाठा संपणार आहे. 

गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. ऊन, वारे यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. त्यामुळे या तलावांतील पाणीसाठा कमी होत आहे. तलावांवर पाणीपुरवठ्यासाठी अवलंबून असलेल्या लोकवस्त्यांवरील पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस झाला, तरच या तलावांमध्ये उपयुक्त पाणीसाठा जमा होऊन पाणीटंचाईचे संकट दूर होईल.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात मिश्रखतांच्या विक्रीवर परिणामजळगाव ः जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीत...
सातबारा डिजिटल करण्यात अकोला राज्यात...अकोला ः सातबारा डिजिटल करण्याच्या प्रकल्पात अकोला...
बुलडाण्यात दुष्काळ निधीचे १९५ कोटी...बुलडाणा ः मागील वर्षामध्ये जिल्ह्यावर ओढावलेल्या...
विंचूर एमआयडीसीत १० हजार मेट्रिक टन...नाशिक  : निफाड तालुक्यातील विंचूर येथे सुरू...
औरंगाबाद जिल्ह्याची सर्वांगीण प्रगतीकडे...औरंगाबाद : ‘‘शासन योजनांच्या प्रभावी...
रेशीम उत्पादकांचा सरकारदरबारी...औरंगाबाद : मंत्रिबदलामुळे रेशीम उत्पादकांना...
सिंधुदुर्गात शेकडो एकर भातशेती कुजलीसिंधुदुर्ग : विजयदुर्ग, खारेपाटण आणि राजपूर खाडी...
नाशिक जिल्ह्यातील भात लागवड अंतिम...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाने गेल्या पंधरा...
‘मदत, पंचनामे, विद्युत पुरवठा...सांगली : ‘‘महापुरानंतर कुटुंबांना शासकीय मदत,...
``जलयुक्त`मुळे हिंगोली जिल्ह्यात ८४...हिंगोली : ‘‘जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत...
अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यात चिकूचे...मुंबई : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या...
नगर जिल्ह्यातील बारा छावण्यांना सव्वा...नगर  ः दुष्काळी स्थितीत पशुधन जगविण्यासाठी...
कोल्हापुरात पूरस्थिती निवळण्यास सुरवातकोल्हापूर : पूर्वेकडील शिरोळ तालुका वगळता...
पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे  ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू...
नगर जिल्ह्यात खरिपाची १०९ टक्के...नगर :  जिल्ह्यातील काही भागांत अद्यापही...
समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात...मुंबई  : कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी...
पूरग्रस्त ग्रामपंचायतींच्या...मुंबई  : अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली़,...
कोकणातील भातशेतीच्या नुकसानीपोटी...रत्नागिरी  ः पावसामुळे कोकणात मोठ्या...
सोयाबीनवरील किडींचे नियंत्रण व्यवस्थापनसध्या स्थितीत सोयाबीन पिकावर तुरळक स्वरूपात...
सेंद्रिय पद्धतीने पीक पोषण सेंद्रिय शेतीमध्ये जमिनीची सुपीकता जपण्याचा विचार...