मिरज पूर्व भागात पाणीपातळी घटली

सांगली : डिसेंबरच्या मध्यालाच भूजल पाणीपातळी झरझर उतरू लागली आहे. यामुळे साधारणतः जानेवारी महिनाअखेरीस पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे
The water level in the eastern part of Miraj dropped
The water level in the eastern part of Miraj dropped

सांगली : यंदा पावसाने जोरदार हजेरी लावली. ऑक्‍टोबर महिन्यात परतीच्या पावसानेही झोडपल्याने मिरज पूर्व भागात भूजल पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. मात्र सिंचन क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा सुरू असून, डिसेंबरच्या मध्यालाच भूजल पाणीपातळी झरझर उतरू लागली आहे. यामुळे साधारणतः जानेवारी महिनाअखेरीस पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

पूर्व भागातील आरग, बेडग, लक्ष्मीवाडी, एरंडोली, शिपूर, सिद्धेवाडी, खंडेराजुरी, सलगरे, बेळंकी, जानराववाडी आदी गावांतील पाझर तलावात सध्या ५० टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. परंतु, लघु मध्यम प्रकल्पांत समाधानकारक पाण्याचा साठा उपलब्ध आहे.

या वर्षी एक सारखा तीन महिने पाऊस व सततची अतिवृष्टी आणि परतीचा पाऊस यामुळे पाझर तलाव, लघु मध्यम प्रकल्पसह, विहिरी, कूपनलिका व बंधारे तुडुंब भरले होते. बळीराजाने धुमधडाक्‍यात रब्बीची पेरणीही केली. पाण्याची चिंता मिटली, अशी आशा बळीराजाला होती.

मात्र जमिनीतून मोठ्याप्रमाणात होणाऱ्या पाण्याच्या उपशामुळे यंदा डिसेंबरच्या मध्यालाच पाणीपातळीत कमालीची घट होऊ लागली आहे. ही स्थिती पाहता, जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीस पाझर तलावातील पाण्याचा साठा संपणार असल्याची माहिती पंचायत समिती जलसंधारण विभागाकडून मिळाली.

सध्या पूर्व भागातील पाझर तलावात पाण्याची पातळी पन्नास टक्के घटली आहे. जमिनीत पाण्याचा मोठ्या प्रमाणात पाझर होऊ लागल्याने जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारी सुरवातीस पाझर तलावातील पाणीसाठा संपण्याची शक्‍यता आहे. - राहुल व्हनखंडे, अभियंता, जलसंधारण विभाग, पंचायत समिती, मिरज

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com