अकोला, वाशीममधील प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला  : कमी पावसामुळे प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची स्थिती सुधारत नसल्याने वऱ्हाडातील नागरिक चिंतेत होते. मात्र, अाॅगस्ट महिन्यात पुनरागमन केलेल्या पावसाने मोठा दिलासा दिला अाहे. प्रामुख्याने अकोला, वाशीम जिल्ह्यांतील प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची स्थिती चांगली झाली असून, बुलडाणा जिल्ह्याला मात्र अद्यापही पावसाची गरज कायम अाहे.   

या महिन्यात गेल्या अाठवड्यापासून पावसाने जोर धरलेला अाहे. प्रामुख्याने अकोला जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. वाशीममध्येही जोरदार पाऊस पडला. या पावसाचा फायदा प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात झाला अाहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा हा मोठा प्रकल्प असून, त्याची एकूण क्षमता ८६.३५ दलघमी अाहे. त्यात सध्या ४६.५९ दलघमी उपयुक्त साठा झाला आहे. त्याची टक्केवारी ५३.५९ एवढी अाहे. वान प्रकल्पाची एकूण क्षमता ८१.९५ दलघमी असून त्यात सध्या ५६.१५ दलघमी म्हणजेच ६८.५२ टक्के पाणीसाठा झाला अाहे. मध्यम प्रकल्पांमध्ये अकोला जिल्ह्यातील निर्गुणा प्रकल्पात ६५.१६, उमा प्रकल्पात ७९.११, वाशीम जिल्ह्यातील अडाण प्रकल्पात ७९.८२, सोनल प्रकल्पात ६६.४९, एकबुर्जी प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा झाला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा प्रकल्पात १६.६५, पलढगमध्ये १७.८४, मस प्रकल्पात ४.१२, मन प्रकल्पात १८.६५, तोरणा प्रकल्पात १३.०५, उतावळी प्रकल्पात ३०.२२ टक्के पाणीसाठा झालेला अाहे. कोराडी प्रकल्प मात्र अद्याप कोरडा अाहे. बुलडाणा जिल्ह्यातील मोठा प्रकल्प असलेल्या नळगंगा प्रकल्पाची एकूण क्षमता ६९.३२ दलघमी असून, त्यात सध्या ९.८६ दलघमी म्हणजेच १४.२२ टक्के पाणीसाठा अाहे. पेन टाकळी प्रकल्पाची एकूण क्षमता ५९.९७ दलघमी असून त्यात केवळ ४.४५ दलघमी म्हणजेच ७.४२ टक्के पाणीसाठा शिल्लक अाहे.

खडकपूर्णा या मोठ्या प्रकल्पाची एकूण क्षमता ९३.४० दलघमी असताना आज यात उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नाही. अकोला जिल्ह्यातील प्रकल्प मागील वर्षात कमी पावसामुळे कोरडे पडले होते. यामुळे रब्बीत सिंचनासाठी पाणी मिळाले नाही. नागरिकांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागले. यावर्षी मात्र जिल्ह्यात अाजवर चांगला पाऊस झाला. त्यातही गेल्या अाठवड्यात झालेल्या पावसाने मोठा फायदा झाला.   अमरावती विभागातील जलसाठा

  • मोठे प्रकल्प - १०
  • उपयुक्त पाणीसाठा     ७७६.७४ दलघमी
  • टक्केवारी     ५१.१० टक्के
  • मध्यम प्रकल्प - २४
  • उपयुक्त पाणीसाठा     ३६४ दलघमी
  • टक्केवारी     ५३.७९ टक्के
  • लघू प्रकल्प - ४६६
  • उपयुक्त पाणीसाठा     ४३४ दलघमी
  • टक्केवारी     ४७.९८ टक्के
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com