वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ

चांदोली धरणातून पाणी सोडले असल्याने मांगले-काखे पूल पाण्याखाली गेला आहे.
चांदोली धरणातून पाणी सोडले असल्याने मांगले-काखे पूल पाण्याखाली गेला आहे.

सांगली : पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चांदोली धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढत असून धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. सांगलीजवळील कृष्णा नदीच्या आयर्विन पुलाची पाणीपातळी २९ फुटांपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

वारणा नदीवरील कोकरूड-रेठरे बंधारा, चरण-सोंडोली व बिळाशी-भेडसगाव हे पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.  दरम्यान, औदुंबर येथील श्री दत्त मंदिरातही पुन्हा पाणी शिरले आहे. सांगली जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरू असून चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे.

शिराळा तालुक्यात शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत २२.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. वारणा धरणात सध्या ३४.०२ टीएमसी एकूण पाणीसाठा झाला असून या धरणातून ११ हजार ३३३ क्युसेक विसर्ग सुरू आहे. कोयनेतून ४९ हजार ८०४ क्युसेक विसर्ग सुरू आहे. कृष्णा नदीची आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी ३२ फुटांवर जाण्याची शक्‍यता आहे. वारणेची पातळी झपाट्याने वाढत आहे. नदीकाठची गावे, वाड्या, वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com