‘येलदरी’तील उपयुक्त पाणीसाठा दुपटीने वाढला

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी : पाणलोट क्षेत्रात झालेला जोरदार पाऊस तसेच खडकपूर्णा धरणातून विसर्गामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असल्यामुळे आठवडभरामध्ये परभणी-हिंगोली जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या पूर्णा नदीवरील येलदरी धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात दुपटीतून अधिक वाढ झाली आहे. रविवारी (ता.२७) सकाळी येलदरी धरणामध्ये ३७.८८ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला होता. सिद्धेश्वर धरणात मात्र अजूनही उणे पाणीसाठा आहे. निम्न दुधना धरणात २.८४, माजलगाव धरणात ५३.७४, करपरा मध्यम प्रकल्पात ३२ टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. मासोळी धरण शंभर टक्के भरले असून सांडव्यावरून विसर्ग सुरू आहे.

गेल्या रविवारी (ता.२०) येलदरी धरणामध्ये १५.७९ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला होता. पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे. त्यामुळे रविवारी (ता.२७) सकाळी येलदरी धरणात ३७.८८ टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला होता. रविवारी बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले असून २२ हजार १२३ क्युसेकने नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे येलदरी धरणातील पाणीसाठ्यात आणखीन वाढ होणार आहे. येलदरीखालील सिध्देश्वर धरणात अद्याप उणे १४ टक्के पाणीसाठा होता. जायकवाडी धरण शंभर टक्के भरले आहे. नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पात ३२ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com