चंद्रपूर जिल्ह्यातील जलस्तर घटला

चंद्रपूर जिल्ह्यातील जलस्तर घटला
चंद्रपूर जिल्ह्यातील जलस्तर घटला

चंद्रपूर : जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान एक हजार २६२ मिमी आहे. मागील वर्षी ९०२. ५१ मिमी पावसाची नोंद आहे. ७९ टक्केच पाऊस झाल्याने हिवाळ्यातच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. भूजल सर्वेक्षण यंत्रणेने सप्टेंबर महिन्यात निरीक्षण विहिरीत पाण्याची पातळीची नोंद घेतली. यात जिल्ह्यातील ४५ गावांतील पाण्याच्या पातळीत मोठी घट झाली आहे. एप्रिल ते जून महिन्यात टंचाईच्या तीव्र झळा बसण्याची शक्‍यता आहे.

भूजल सर्वेक्षण व विकास विभागाच्या १३४ निरीक्षण विहिरी आहेत. त्यांच्या पाण्याच्या पातळीचे निरीक्षण जानेवारी, मार्च आणि सप्टेंबर महिन्यात करण्यात येते. त्याचआधारे पाणीटंचाईची स्थिती भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा जाहीर करते. गेल्या सप्टेंबर महिन्यात १३४ निरीक्षण विहिरींतील पाण्याच्या पातळी तपासली. त्याआधारे जिल्ह्यातील ४५ गावांत एप्रिल ते जून या महिन्यांत तीव्र पाणीटंचाई जाणवू शकते, असा निष्कर्ष काढला आहे. यात सर्वाधिक गावे भद्रावती तालुक्‍यातील १८, ब्रह्मपुरीतील १८ आणि चंद्रपुरातील दहा गावांचा समावेश आहे. 

गावातील टंचाईसदृश परिस्थितीचा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. त्याआधारे टंचाई आराखडा तयार होईल. जून ते सप्टेंबर महिन्यात केवळ ९०२.५१ मिमी इतकाच पाऊस झाला. त्याची टक्केवारी ७९.०२ इतकी आहे. २०. ९७ टक्के पाऊस कमी झाला. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांत नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांपासून टंचाई जाणवू लागली आहे. 

टंचाईग्रस्त गावे चारगाव, कुणाडा, कुणाडा टोला, भद्रावती, ढोरवासा, तेलवासा, सुमठाणा, चिरादेवी, मोहबाळा, कोची, पिपरी, गोरज, रय्यतवारी, घोनाड, साखरवाही, बेलसनी, मुरसा, चांदूर, घुग्घुस, म्हातारदेवी, नकोडा, पांढरकवढा, शेणगाव, उसगाव, वढा, धानोरा, पिपरी, बेलगाव, देऊळगाव, कोलारी, तपाळ, अहेरनवरगाव, भालेश्‍वर, दिघोरी, लाडज, नांदगाव जानी, नान्होरी, पिंपळगाव, चिखलगाव, हरदोना, सोंद्री, बोंडेगाव, चिंचोली, सावलगाव, सोनेगाव.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com