Agriculture news in marathi Water of Mahisal Yojana Entered the third stage | Page 2 ||| Agrowon

म्हैसाळ योजनेचे पाणी तिसऱ्या टप्प्यात दाखल

टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 मार्च 2021

म्हैसाळ योजनेचे पंप धिम्या गतीने सुरू आहेत. बेडग येथील तिसऱ्या टप्प्यातील पंप हाउसमध्ये म्हैसाळ योजनेचे पाणी मुख्य कालव्यातून दाखल झाले.

सांगली : म्हैसाळ योजनेचे पंप धिम्या गतीने सुरू आहेत. बेडग येथील तिसऱ्या टप्प्यातील पंप हाउसमध्ये म्हैसाळ योजनेचे पाणी मुख्य कालव्यातून दाखल झाले. सध्या म्हैसाळ येथील टप्पा क्रमांक एकमध्ये दोन पंप सुरू आहेत. नरवाड येथील टप्पा क्रमांक दोनमध्ये दोन पंप सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यात पाणी दाखल झाले असून, पंप हाउस समोरील कालव्यातील पाणीपातळीत वाढ झाल्यानंतरच टप्पा क्रमांक तीनमधून मोटारी सुरू करणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.

सध्या टप्पा क्रमांक एकमधील दोन पंपाद्वारे व टप्पा क्रमांक दोनमधील दोन पंपाद्वारे, अशी एकूण चार पंपाद्वारे सध्या पाण्याचा विसर्ग पुढे सुरू आहे. म्हैसाळ व नरवाड येथील पंप हाउसमध्ये आणखी एका पंपाद्वारे पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. धिम्या गतीने पाण्याचा विसर्ग सुरू असून, आरग-लांडगेवाडी येथील टप्पा क्रमांक चारमध्ये रविवारी पहाटे पाणी पोहोचण्याची शक्‍यता आहे.

सध्या शेतकऱ्यांची पाणी मागणी कमी असल्याने पोट शाखा कालव्याद्वारे पाणी अद्याप कोणत्याही क्षेत्राला देण्यात आले नसल्याचे दिसत आहे. जत तालुक्‍यात पाणी पोहोचल्या नंतरच पोट शाखा कालवे सुरू केले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व योजनेची रक्कम अदा केल्यानंतरच पोट कालव्यात पाणी सोडण्यात येणार आहे, अशी अधिकृत माहिती सूत्रांनी दिली.

मिरजपूर्व भागातील आरग, लिंगनूर, खटाव, शिंदेवाडी, लक्ष्मीवाडी या गावात सध्या पाण्याची पातळी खालावली असून, पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मुख्य कालव्यातून वाहणारे पाणी मागणीनुसार स्रोतांत सोडल्यानंतरच विहिरींना पाझर फुटणार आहे. त्यामुळे मुख्य कालव्यातून वाहून जाणारे पाणी जत तालुक्‍यात जाईपर्यंत शाखा कालवे सुरू होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...
धान चुकाऱ्याअभावी शेतकऱ्यांची आर्थिक...गोंदिया : गेल्यावर्षी आधारभूत दराने धान विक्री...
सांगलीत खरिपासाठी हवे ३३ हजार ६९०...सांगली  : यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कृषी...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
तुलनेत यंदा दुपटीने गाळपकोल्हापूर : गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, कांदा, फळ...जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीत...
अस्वलाकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी...भंडारा : जंगलालगत असलेल्या शेतीत वन्यप्राण्यांचा...
अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, ‘...मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर...
अति उष्ण, ढगाळ हवामानआठवडा अखेरपर्यंत ते १००६ हेप्टापास्कल इतके राहतील...
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे...पुणे ः बहुप्रतीक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड...
नाशिक : माथाडी युनियनकडून ‘काम बंद’नाशिक : राज्य शासनाच्या विविध माथाडी मंडळातील...
पुणे ‘जि.प.’तर्फे कर्मचाऱ्यांना मिळणार...पुणे ः ‘‘जिल्हा परिषदेच्या बक्षिस योजनेतून आता...
‘खरिपात सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरा’सातारा : येत्या खरीप हंगामात  सोयाबीनचे...
वाशीम जिल्ह्यात कृषी निविष्ठा...वाशीम : जिल्ह्यातील शेतकरी, कंपनी प्रतिनिधी आणि...
रसवंतीचालक, ऊस उत्पादकांना आर्थिक...बुलडाणा : ‘‘जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो शेतकरी...
‘ताकारी’तून तिसरे आवर्तन सुरूवांगी, जि. सांगली  : ताकारी योजनेतून यंदाचे...
नगर, नाशिकमध्ये १४ साखर कारखान्यांचा...नगर ः नगर, नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत २६...
सांगलीत द्राक्ष बागांची खरड छाटणी अंतिम...सांगली : पुढील हंगामातील घडांची निर्मिती आणि...
‘कादवा’कडून ३०० चा तिसरा हप्ता...नाशिक : ‘‘कादवा सहकारी साखर कारखान्याचे गळीत...
सोलापूरच्या कृषी विभागात कोरोनाचा शिरकावसोलापूर ः जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा विळखा वरचेवर...