Agriculture news in marathi, Water from the Mahuli pump | Agrowon

माहुली पंपगृहातून आटपाडीकडे पाणी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

आटपाडी, जि. सांगली : लोकांच्या मागणीनंतर अखेर हिंगणगाव तलावातून वाहून जाणारे पाणी माऊली पंप हाऊसमधून उचलून आटपाडीकडे सोडण्यात आले. पाणी कमी झाल्यामुळे जादा वेळ पंप चालत नाहीत. टेंभू योजनेच्या पंप दुरस्तीचेही काम अंतिम टप्प्यात आले आहे, अशी माहिती मिळाली. 

आटपाडी, जि. सांगली : लोकांच्या मागणीनंतर अखेर हिंगणगाव तलावातून वाहून जाणारे पाणी माऊली पंप हाऊसमधून उचलून आटपाडीकडे सोडण्यात आले. पाणी कमी झाल्यामुळे जादा वेळ पंप चालत नाहीत. टेंभू योजनेच्या पंप दुरस्तीचेही काम अंतिम टप्प्यात आले आहे, अशी माहिती मिळाली. 

महापुरात कृष्णा नदीतून प्रचंड पाणी वाहून गेले. टेंभू योजना सुरू करून आटपाडी तालुक्‍यातील तलाव या पाण्याने भरावे, अशी मागणी होती. मात्र टेंभूचे पंप हाऊस पाण्यात गेल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे टेंभू उपसा सिंचन योजना सुरू होत नव्हती. दुसरीकडे हिंगणगाव तलावातून अतिरिक्त पाणी वाहून जात होते. ते माहुलीत आणून तेथून उचलून आटपाडी तालुक्‍यातील तलाव भरावेत, अशीही मागणी केली जात होती. 

आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्र्यांकडे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाला द्यावे, अशी मागणी केली. त्यानंतर राज्य सरकारने हे पाणी मोफत दुष्काळी भागाला देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसारहे पाणी माहुली पंप हाऊस मध्ये आणले आहे. 

पाणी कमी झाल्यामुळे दोन पंप सुरू करून पाणी उचलण्यात येत आहे. हे पाणी टप्पा क्रमांक चारमधून उचलून खानापूर तालुक्‍यातील भाग्यनगर तलावात सोडण्यात आले आहे. पाण्याचा वेग कमी झाल्यामुळे ज्यादा पंप सुरू करता येत नाहीत. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. आटपाडी तालुक्‍यातील घाणंद ते हिवतड या कालव्यावर जागोजागी गेटची कामे सुरू  आहेत. त्यामुळे पाणी सोडता येत नाही. सध्या टेंभू योजनेच्या पंपगृहातील पंप दुरुस्तीची आणि कालव्यातील कामे अंतिम टप्प्यात आहेत. ती चार दिवसांत पूर्ण होऊन टेंभू योजना सुरू करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.

इतर बातम्या
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन यंदा ७०...नगर  ः जिल्ह्यात यंदा उडदाची उत्पादकता...
पीक उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न...पुणे  ः  कृषी विद्यापीठांकडून शेतकरी...
महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी लागवडीस वेगसातारा  ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई...
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार ः...मुंबई : आगामी पाच वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त...
आम्ही सत्तेत आल्यास चार महिन्यांत...वणी, जि. यवतमाळ  ः शेतकऱ्यांना कर्जमाफी...
संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव...अकोला : संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती...
वाशीम : मानवी साखळीतून साकारले निवडणूक...वाशीम : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा...
नंदुरबार जिल्ह्यात पीक काढणी वेगातनंदुरबार  : जिल्ह्यात खरिपाच्या हंगामातील...
राज्यात साडेचार हजार सावकार अनधिकृतपुणे : शेतकरी आत्महत्येच्या समस्येवर प्रभावी उपाय...
सोयाबीन सुडी पेटविण्याच्या घटनांमध्ये...बुलडाणा  ः वैयक्तिक मतभेद, आपापसातील वाद आदी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर...
चौथीच्या अभ्यासक्रमातून शिवरायांचा...मुंबई : महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण...
दुधाचे थकीत अनुदान देण्याच्या हालचालीपुणे: राज्यातील डेअरी उद्योगांचे अडकलेले...
अमरावती विभागात सोयाबीन उत्पादकता घटलीअमरावती  ः गेल्या काही वर्षांत कापसाला...
बिगर नोंदणीकृत उत्पादनासाठी हवा कायदा...सध्या खते, कीटकनाशके उत्पादन व विक्रीसाठी दोन...
आपल्या मताची किंमत दाखवून देण्याची वेळ...शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक या विषयांचा...
भिवापूर येथे सोयाबीन खरेदीला सुरवातभिवापूर, नागपूर  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘महाॲग्री ते महाॲग्रीटेक’ एक स्वप्नरंजन राज्यात शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन होतील असे एक...
महायुतीत आमची अवस्था इकडे आड तिकडे...नाशिक  : ‘‘महायुतीच्या जागावाटपात नाराज असलो...
निवडणुकीत शेतकरी प्रश्न शोधावे लागतात...निवडणुकांतून शेतकरी सोडून सारे राजकीय घटक...