माहूरच्या कुंडातील पाणी सर्वोत्तम

माहूर येथील मातृतीर्थ, भानुतीर्थ, काशीकुंड, ऋणमोचन कुंड जलाशयातील पाण्याचे ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यात आले. मातृतीर्थ येथील पाण्यातील ऑक्सिजन हे ११.०० पीपीएम आढळून आले. एवढ्या चांगल्या प्रमाणात ऑक्सिजन हे केवळ हिमालयीन नद्या, गंगा नदीच्या उगम क्षेत्रात आढळते.
The water in Mahur's pond is the best
The water in Mahur's pond is the best

नांदेड ः ‘गोदावरी नदी संसद’ परिवारामार्फत नांदेड जिल्ह्यातील जलप्रदूषण तपासणी केमिकल किटद्वारे करण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत माहूर येथील मातृतीर्थ, भानुतीर्थ, काशीकुंड, ऋणमोचन कुंड जलाशयातील पाण्याचे ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यात आले. मातृतीर्थ येथील पाण्यातील ऑक्सिजन हे ११.०० पीपीएम आढळून आले. एवढ्या चांगल्या प्रमाणात ऑक्सिजन हे केवळ हिमालयीन नद्या, गंगा नदीच्या उगम क्षेत्रात आढळते.

मातृतीर्थ कुंडाची निर्मिती श्री रेणुकादेवी पुत्र श्री परशुराम भगवान यांनी असल्याचे पुरातन ग्रंथांमधून सांगितले जाते. तसेच हे कुंड म्हणजे गंगेचे तीर्थ समजले जाते. या प्रयोगामुळे मातृतीर्थ येथील जल हे अतिउच्च दर्जाचे आहे हे सिद्ध होते. तसेच भानुतीर्थ कुंडातील पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण १०.५ पीपीएम आढळून आले आहे. काशीकुंडातील पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण ८.५ पीपीएम आढळून आले आहे. तसेच ऋण मोचन कुंडातील पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण १०.०० पीपीएम आढळून आले आहे.

लोकसहभागातून काढला गाळ २०१९ मध्ये श्री रेणुका देवी संस्थान, सूर्योदय फाउंडेशन, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार, माहूर महाश्रमदान ग्रुप, जलस्वराज्य परिवार यांच्या सहकार्याने या कुंडातील शेकडो वर्षे साचलेला गाळ लोकसहभागातून काढण्यात आला होता. हा गाळ काढण्यात आल्यामुळे या सर्व कुंडास नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. २०२० मध्ये श्री रेणुका देवी संस्थानच्या वतीने मातृतीर्थ परिसरात मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण, वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करण्यात आले. श्री रेणुकादेवी संस्थानचे अध्यक्ष, उपविभागीय अधिकारी, विश्‍वस्त चंद्रकांत भोपी, संजय कन्हव यांच्या मार्गदर्शनाखाली कामे पूर्ण करण्यात येत आहेत. भक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे मातृतीर्थक्षेत्राचे दर्शन भक्तगणाना सूर्योदय व सूर्यास्तास होत आहे. नीलेश केदार गुरुजी व माहूर महाश्रमदान ग्रुप यांचे सहकार्य या कार्यास लाभत आहे. भविष्यात पाणीप्रदूषण होण्यासाठी गोदावरी नदी संसदमार्फत वैज्ञानिक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी ‘गोदावरी नदी संसद’ फेसबुक ग्रुप स्थापन करण्यात आला आहे असून, शेकडो नांदेडकर या मोहिमेशी जुडले आहेत. नदी व कुंड प्रेमींनी या ग्रुपशी जुडावे असे आवाहन केले आहे.

हिमालय भागात पाण्यात सर्वांत जास्त ऑक्सिजनचे प्रमाण (प्राणवायू) आढळते. त्याच दर्जाचे पाणी तीर्थक्षेत्र माहूर येथील ‘मातृतीर्थ’ येथे आढळून आले आहे. - दीपक मोरताळे, गोदावरी नदी संसद (जलस्वराज्य परिवार)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com