डाळिंब बागांसाठी पाण्याचे व्यवस्थापन

जानेवारी अखेरपासून पाण्याची उपलब्धता कमी होत जाते. निर्यातक्षम डाळिंब बागेसाठी पाण्याचे व्यवस्थापन करताना बाष्पीभवन, बाष्पोत्सर्जन, पीक गुणांक यांचा आधार घ्यावा.
Water management in pomo orchards
Water management in pomo orchards

जानेवारी अखेरपासून पाण्याची उपलब्धता कमी होत जाते. निर्यातक्षम डाळिंब बागेसाठी पाण्याचे व्यवस्थापन करताना बाष्पीभवन, बाष्पोत्सर्जन, पीक गुणांक यांचा आधार घ्यावा. पीक उत्पादनामध्ये पाणी व्यवस्थापनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वनस्पतींच्या वाढीच्या व तग धरण्याच्या विविध अवस्थेत पाण्याची आवश्यकता असते. पाण्याचे प्रमाण (कमी किंवा जास्त) असल्यास वनस्पतींच्या वाढ आणि विकासावर थेट परिणाम करतात. उत्पादन आणि गुणवत्ता यावर विपरीत परिणाम होतो. पिकांसाठी सिंचनाची नेमकी आवश्यकता निश्‍चित करण्यासाठी बाष्पीभवन, बाष्पोत्सर्जन यांचे योग्य ज्ञान गरजेचे आहे. या दोन्ही घटकांमुळे कमी होणाऱ्या पाण्याची भरपाई सिंचनातून करावी लागते. हे दोन्ही घटक समजल्यास पाणी व्यवस्थापन किंवा सिंचनाचे योग्य वेळापत्रक करता येते. पिकाला लागणाऱ्या पाण्याची गरज ही लिटर प्रति दिवस, मिलिमीटर प्रति दिवस, मिलिमीटर प्रति महिना किंवा मिलिमीटर प्रति हंगाम या प्रमाणे व्यक्त केली जाते. त्या प्रमाणे व्यवस्थापन केले जाते. डाळिंब उत्पादनामध्ये भारत पहिल्या क्रमांकावर असला, तरी डाळिंबाची हेक्टरी उत्पादकता ही अन्य देशांच्या तुलनेत कमी आहे. त्यामागे पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन हे महत्त्वाचे कारण आहे.  मुळात सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी असून, डाळिंब पिकास गरजेनुसार पाणी देण्याची गरज आहे. 

  •  बाष्पीभवन हा घटक हवामानानुसार बदलतो. वेगवेगळ्या प्रदेशात, जिल्ह्यासाठी बाष्पीभवनाचे प्रमाण जाणून घ्यावे. डाळिंबाच्या लागवडीच्या वेगवेगळ्या टप्प्यात, वयोगटात पाण्याच्या आवश्यकता भिन्न असते. वाढीच्या अवस्था व वयानुसार पीक गुणांक विकसित करावा. 
  •  बागांची पाण्याची आवश्यकता ही झाडाचे वय, फळांचा भार, हंगाम आणि मातीचा प्रकार या घटकांवर अवलंबून असते. 
  •  महाराष्ट्रातील डाळिंब बागांसाठी महिन्याप्रमाणे सर्वसाधारण सिंचन पाण्याची आवश्यकता तक्ता १ मध्ये दर्शविली आहे. 
  •  डाळिंब बागांची त्यांचे वय, हंगाम आणि वाढीच्या अवस्थेनुसार आंबे, मृग आणि हस्त बहरमधील सर्वसाधारण सिंचन पाण्याची गरज अनुक्रमे तक्ता २, ३ व ४ मध्ये दर्शविली आहे. 
  •  डाळिंब बागांची पाण्याची आवश्यकता निश्‍चित करताना महाराष्ट्रातील प्रमुख डाळिंब उत्पादक जिल्ह्यातील गेल्या ४० वर्षांतील बाष्पीभवनाचा अभ्यास केला आहे. 
  •  डाळिंब बागेत सिंचनासाठी ठिबक किंवा सूक्ष्म सिंचन प्रणालीचा वापर करावा. डाळिंब बागेत लागवडीच्या पहिल्या दोन वर्षांपर्यंत एका ओळीसाठी एक लॅटरल आणि प्रति झाडासाठी दोन ड्रीपर्स असावेत. पुढे तिसऱ्या व चौथ्या वर्षासाठी दोन लॅटरल आणि चार ड्रीपर्स, आणि पाचव्या वर्षापासून पुढे झाडांच्या वाढलेल्या आकारानुसार दोन लॅटरल आणि सहा ड्रीपर्स असे नियोजन करावे. यातून पाण्याची गरजपूर्तता करणे शक्य होते. 
  • महत्त्वाचे मुद्दे 

  •  विश्रांतीच्या काळात आणि पीक कालावधीत फळ येईपर्यंत जास्त पाणी देणे टाळा. 
  •  फळवाढीच्या कालावधीत आवश्यकतेनुसार हळूहळू पाणी देणे वाढवा. अगदी फळ तोडणीच्या अगोदर एक महिन्यापर्यंत वाढवत राहा. शेवटच्या महिन्यात पाण्याचे प्रमाण हळूहळू कमी करा. पाणी देणे हळूहळू कमी करत किंवा वाढवत जावे. ते किती प्रमाणात करायचे यासाठी तक्त्यांमध्ये दर्शविल्याप्रमाणे, समजा तुम्ही फळबागेस आज पाणी दिले असेल, तर दुसऱ्या दिवशी २४ तासांनंतर जमिनीतील ओलावा मोजण्यासाठी झाडाच्या मुळांपासून १५-२० सेंटिमीटर खोलवर जाऊन मातीचा नमुना घ्या. आपल्या हाताच्या घट्ट मुठीत माती संकलित करण्यासाठी आपली मूठ बंद करा.
  •  मातीचा नमुना सैल राहिला, त्याचा साचा किंवा मूस तयार झाला नाही, तर तर पिकाला तक्त्यांमध्ये दर्शविल्याप्रमाणे सिंचन करा. 
  •  जर मातीच्या नमुन्याचा साचा किंवा मूस तयार झाला तर तो जमिनीवर फेकून पाहा. तो साचा फुटून गेल्यास पाणी परिपूर्ण असल्याचे समजा. दुसऱ्या दिवशी पुन्हा वरीलप्रमाणे तपासणी करून सिंचनाची गरज आहे की नाही, ते ठरवा. गरज असल्यास सिंचन करा.
  •  जर मातीच्या नमुन्याचा तयार झालेला साचा किंवा मूस जमिनीवर फेकल्यावर न फुटल्यास पाणी जास्त असल्याचे समजावे. म्हणजेच सिंचनाची आवश्यकता नाही. गरजेनुसार पुढील दिवशी पुन्हा तपासणी करून निर्णय घ्यावा. 
  • महाराष्ट्रातील डाळिंब बागांसाठी महिन्याप्रमाणे सिंचन पाण्याची आवश्यकता
    महिना   पाण्याची आवश्‍यकता (लिटर/दिवस/झाड)
    पहिले वर्ष  दुसरे वर्ष तिसरे वर्ष  चौथे वर्ष  पाच व अधिक
    जानेवारी     ४     ७    १५  १९   २१
    फेब्रुवारी      ९   १९   २५   २७
    मार्च     ९     २४ ३१ ३३
    एप्रिल     ७  १० २८  ३६  ३९
    मे     ११ ३० ३९ ४३
    जून     ५  ८  २२ २८ ३१
    जुलै ४  ७  १६ २१ २३
    ऑगस्ट      ५ १६ २१ २३
    सप्टेंबर  ३      ६ १६ २१   २३
    ऑक्टोबर ६  १६ २१  २२
    नोव्हेंबर ३    ६ १४  १९ २०
    डिसेंबर १३ १७ १९

    संपर्क- डॉ. अरुण भगत,  ७३८७१२६८९१, (संशोधक, वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट, पुणे)  डॉ. देवदास मेश्राम,  ७५०७१९२६०६ (मुख्य शास्त्रज्ञ, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com