Agriculture news in marathi water melon, scrobiculate growers hit farmers | Agrowon

कलिंगड, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना फटका

टीम अॅग्रोवन
रविवार, 29 मार्च 2020

सोलापूर ः खास उन्हाळी हंगाम डोळ्यासमोर ठेवून कलिंगड, खरबूज या फळाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना ‘कोरोना’ विषाणूमुळे देश लॉकडाऊन झाला आहे. त्याचा मोठा फटका बसला असून, कलिंगड, खरबुजाचा प्रतिकिलोचा १० ते १५ रुपयांचा दर सध्या ४ ते ५ रुपयांवर आला आहे. उठाव मिळत नसल्याने दर घसरले आहेतच. पण स्थानिक भागासह पुणे, मुंबईच्या विस्कळीत बाजारामुळेही नुकसान सहन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. 

सोलापूर ः खास उन्हाळी हंगाम डोळ्यासमोर ठेवून कलिंगड, खरबूज या फळाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना ‘कोरोना’ विषाणूमुळे देश लॉकडाऊन झाला आहे. त्याचा मोठा फटका बसला असून, कलिंगड, खरबुजाचा प्रतिकिलोचा १० ते १५ रुपयांचा दर सध्या ४ ते ५ रुपयांवर आला आहे. उठाव मिळत नसल्याने दर घसरले आहेतच. पण स्थानिक भागासह पुणे, मुंबईच्या विस्कळीत बाजारामुळेही नुकसान सहन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. 

जिल्ह्यातील मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूरसह पाणी असणाऱ्या बहुतांश भागात जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये कलिंगड आणि खरबूजाची सर्वाधिक लागवड होते. मोहोळ तालुक्यातील पापरी, खंडाळी हा परिसर तर त्यासाठी खास प्रसिद्ध आहे. पण यंदा ‘कोरोना’ विषाणूच्या संकटामुळे हे शेतकरी धास्तावले आहेत. अनेक शेतकऱ्यांचा माल काढणीस आला आहे. तर काहींचा आठवड्याभरात सुरु होणार आहे. या सर्वांना त्याच्या विक्रीची चिंता लागली आहे. 

वास्तविक, या हंगामात दरवर्षी बाहेरील व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या शेतावर येऊन कलिंगड, खरबुजाची खरेदी करतात. पण सध्या कोणीच इकडे फिरकत नसल्याने अडचण होऊन बसली आहे. एकरी किमान ५० ते ९० हजारापर्यंतचा खर्च या पिकाला येतो. पण सध्या तोही निघेल की नाही, याची शंका शेतकऱ्यांना सतावते आहे. 

सरकार पुणे, मुंबईच्या बाजारपेठेकडे जाणाऱ्या वाहतुकीच्या परवान्याबाबत सकारात्मक असले, तरी वाहनचालक आणि व्यापाऱ्यांच्या प्रतिसादाअभावी शेतकरी अडचणीत आले आहेत. शिवाय ही दोन्हीही फळे नाशवंत आहेत. ती फारकाळ टिकू शकत नाहीत. त्यामुळे वेळीच त्यावर मार्ग निघण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. 

कोट
मी दीड एकर क्षेत्रावर यंदा कलिंगड केले. पण सध्याच्या परिस्थितीमुळे अडचण झाली आहे. कलिंगडासाठी ९० हजारांचा खर्च झाला आहे, तो तरी निघेल, का याची शंका आहे. काय करावं सूचत नाही.
- गोरख आसबे, शेतकरी, मारापूर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर
 


इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...