`म्हैसाळ`चे पाणी हे केवळ मृगजळच

`म्हैसाळ`चे पाणी हे केवळ मृगजळच
`म्हैसाळ`चे पाणी हे केवळ मृगजळच

सांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६४ गावांना म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी देणे हे केवळ मृगजळ ठरत आहे. कृष्णा तंटा लवादाने म्हैसाळ योजनेतील अंतर्भूत गावांसाठी १७.४४ टीएमसी इतक्या पाणी वापरास मान्यता दिली आहे. या पाण्याचे नियोजन निश्चित केले आहे. त्यामुळे प्रस्ताविक  ६४ गावांना सिंचन क्षेत्रासाठी पाणीच शिल्लक नाही. त्यामुळे या गावांना पाणी देणे दिवसेंदिवस अडचणीचे ठरत आहे.

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेला १९८२ मध्ये मंजुरी मिळाली. त्यानंतर युती शासनाने म्हणजे १९९५ मध्ये सुधारित योजनेमध्ये ७० गावांचा समावेश केला. त्यामध्ये जत तालुक्यातील ५५ गावे, सांगोला तालुक्यातील ८, मंगळवेढा तालुक्यातील ७ गावांचा समावेश करण्यात आला.

या योजनेत सांगली जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, जत आणि सोलापूर जिल्ह्यांतील मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यांना पाणी दिले जाते. या गावासाठी १७.४४ टीएमसी एवढे पाणीवापरास कृष्णा तंटा लवादाने मंजुरी दिली आहे.

 या पाण्याचे नियोजन निश्चित केले आहे. त्यामुळे या गावातील शेतीला पाणी मिळते आहे. वास्तविक पाहता जत तालुक्यातील १२३ गावे आहेत. त्यापैकी ५८ गावांना या योजनेचे पाणी मिळते. त्यामुळे या गावातील शेती ओलिताखाली आली आहे.

जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६४  गावांना गेल्या ३५ वर्षांपासून पाणी द्यावी, अशी मागणी केली जात आहे. प्रत्येक निवडणूकच्या पार्श्वभूमीवर या गावांना पाणी देण्याची घोषणा केली जाते आहे. परंतु, ही घोषणा केवळ घोषणाच ठरत असल्याचे चित्र आहे.

सर्वेक्षणच नाही जत तालुक्यातील वंचित गावांना पाणीदेण्यासाठी सर्वेक्षण केले, असे पाटबंधारे विभाग ठामपणे सांगत आहे. वास्तविक पाहता.  जत तालुक्यातील व्हसपेठ व गुड्डापूर तलावात पाणी जाऊ शकते. मात्र, सोरडी, संखय दरीकोणुर, दरीबडची, सिद्धनाथ, कानगेरी, तिकोडी या तलावांतदेखील या योजनचे पाणी पोचू शकते.  परंतु पाटबंधारे विभागाने अद्यापही सर्वेक्षण केले नाही.

अतिरिक्त पाणी हवे

या योजनेतून १७.४४ टीएमसी पाणी निश्चित केले आहे. त्यामुळे ६४ गावे या योजनेत समाविष्टच नाहीत. तसेच प्रस्तावित ६४ गावांच्या सिंचन क्षेत्रासाठी योजनेत समाविष्ट करण्यासाठी पाणीच शिल्लक नाही. त्यामुळे अतिरिक्त पाण्याची गरज आहे. परंतु त्यासाठी मंजुरी आवश्यक आहे. मात्र, ती मिळाली असल्याचे वारंवार सांगण्यात येत असले, तरी गेल्या ३५ वर्षांपासून पाणी का मिळाले नाही, असा प्रश्न आहे. 

तालुकानिहाय क्षेत्र

तालुका क्षेत्र
जत  २२ हजार ५५०
सांगोला ४ हजार
मंगळवेढा  ६ हजार
एकूण ३२ हजार ५००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com