Agriculture news in marathi water project ful in Pathrud area | Page 2 ||| Agrowon

पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंब

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

पाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात मागील दहा - बारा दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे पाथरूड, बागलवाडी, अंतरवली मध्यम प्रकल्प पाण्याने तुडूंब भरले आहेत. 

पाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात मागील दहा - बारा दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे पाथरूड, बागलवाडी, अंतरवली मध्यम प्रकल्प पाण्याने तुडूंब भरले आहेत. 

या वर्षी मृग नक्षत्रापासून चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे नदी- नाल्यात जुलै महिन्यापासून पाणी दिसून येत आहे. त्यामुळे खरीप हंगामातील उडीद, मूग, सोयाबीन, तूर या पिकांची वाढ उत्तम झाली. मूग, उडीद काढणी व मळणीच्या वेळेस सतत पाऊस पडत आहे. त्याचे नुकसान होऊ लागले आहे.

पूर्वा व उत्तरा नक्षत्रामध्ये पाथरूड, अंतरवली, आंबी, दुधोडी, जांब, सावरगाव, उमाचीवाडी, वडाचीवाडी, बागलवाडी, नळी वडगाव, मात्रेवाडी, नान्नजवाडी परिसरातील डोंगराळ भागात सतत दमदार पाऊस होत आहे. त्यामुळे या भागातील नदी - नाले, सिमेंट व कोल्हापूरी बंधाऱ्यात मुबलक पाणी साठले आहे. 

पाथरुड, बागलवाडी, अंतरवली येथील मध्यम प्रकल्प तीन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर या वर्षी शंभर टक्के पाण्याने तुडूंब भरले आहेत. जमिनीतील पाणी पातळी वाढल्याने विहरी व कुपनालिकेतील पाणी वरुन वाहू लागले आहे.

पाथरूड, अंतरवली, बागलवाडी प्रकल्प भरल्याने येणाऱ्या रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, कांदा पिकासह पालेभाज्या व ऊस पिकासाठी तलावातील पाण्याचा फायदा होणार आहे. बागलवाडी तलावातून पाथरूड, बागलवाडी, उमाचीवाडी, वडाचीवाडी येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पिण्यासाठी पाणी पुरवठा होत आहे.  

पाथरूड, बागलवाडी, दुधोडी, वडाचीवाडी, उमाचीवाडी, नान्नजवाडी, आनंदवाडी तसेच अंतरवली मध्यम प्रकल्पातून नळी - वडगाव, तित्रज, अंतरवली येथील शेकडो हेक्टर जमिनी ओलीताखाली येणार आहेत. हे प्रकल्प भरल्यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, फळे व पालेभाज्या पिकांना पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या.


इतर ताज्या घडामोडी
एफआरपी एकरकमी देणार की तुकडे होणार?सातारा : यावर्षीच्या ऊस हंगामासाठी एक ते दोन...
कृषी योजनांच्या अंमलबजावणीत अकोला अव्वलअकोला ः जिल्ह्यात कृषी विभागामार्फत राबविलेल्या...
पीक नुकसानीची मदत निश्‍चित मिळेल ः मलिकपरभणी : ‘‘हवामान विभागाने रविवार (ता.२५)...
रयत क्रांती संघटनेतर्फे जागरण गोंधळ...पुणे ः  रयत क्रांती संघटनेतर्फे...
इथेनॉल पूर्णत्वासाठी ‘कादवा’ला सहकार्य...नाशिक : ‘‘अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उत्तम...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पुन्हा मुसळधार...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यात अनेक दिवसांची...
नाथाभाऊ काय चीज आहे, दाखवून देऊ : शरद...मुंबई: नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने...
शेतकऱ्यांना मदत करण्याचीच भूमिका : शहालातूर : ‘‘कृषी उत्पन्न बाजार समितीने अडचणीच्या...
धान्य खरेदीसाठी नोंदणीचे निर्देशच नाहीत जळगाव ः जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून शासकीय धान्य...
मदतीच्या घोषणेचे स्वागत, पण तोकडीः डॉ....नगर ः राज्यात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त...
जलसंधारणाच्या `बुलडाणा पॅटर्न`चा डंकाअकोला ः महामार्ग तयार करताना त्यासाठी लागणारे...
सोयाबीनचे मूल्यवर्धित पदार्थसोयाबीनपासून सोया-दूध, सोया पनीर, पीठ आणि...
परभणीत रताळी १३५० रूपये प्रतिक्विंटलपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
कापूस उत्पादकांचे शोषण थांबवा: विजय...नागपूर: देशात कापसाचे दर कमी होत असतानाच...
फवारणीनंतर १८ एकरातील कपाशीने टाकल्या...अकोला ः जिल्ह्यातील म्हातोडी येथील शेतकऱ्याने...
खडसेंच्या पक्षांतराने बदलणार राजकीय...जळगाव ः भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे...
मक्याची लॉट एंट्री न झाल्याने ‘शोले...सटाणा, जि. नाशिक: हमीभावाने खरेदी केलेल्या...
परभणी जिल्ह्यात महावितरणची ६३७...परभणी :  जिल्ह्यातील वीजचोरीला आळा...
ला निनामुळे मान्सून प्रभावितलॉकडाऊनची परिस्थिती पाहता, महाराष्ट्रात...
तंत्रज्ञान हरभरा लागवडीचे...जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पीक...