जत तालुक्‍याच्या पूर्व भागात फळबागांना टॅंकरचा आधार 

गेल्यावर्षी जत तालुक्‍यातील पश्‍चिम भागात चांगला पाऊस झाला पण आमच्याकडे अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही. डाळिंबाची पाचशे झाडे आहेत. चार दिवसातून एक टॅंकर विकत आणून डाळिंबाला घातले आहेत. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. - पांडुरंग सावंत, माडग्याळ, ता. जत
जत तालुक्‍याच्या पूर्व भागात फळबागांना टॅंकरचा आधार 
जत तालुक्‍याच्या पूर्व भागात फळबागांना टॅंकरचा आधार 

सांगली ः जत तालुक्‍याच्या पूर्व भागात डाळिंब छाटणी पूर्ण झाली आहे, तर द्राक्षाची छाटणी सुरु आहे. या बागांना आता पाण्याची आवश्‍यकता आहे. परंतु पाणी उपलब्ध होत नसल्याने दरवर्षीप्रमाणे फळबागांना टॅंकरचा आधार द्यावा लागत आहे. सध्या पश्‍चिम भागातून पाणी विकत आणून घालावे लागत असले तरी काही दिवसांनी पश्‍चिम भागात देखील पाणी उपलब्ध होणार नाही, त्यामुळे पुन्हा कर्नाटक सीमेवरून पाणी आणावे लागणार आहे. परंतु कोरोनामुळे कर्नाटक सीमेवरून पाणी आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. 

जत तालुक्‍यात द्राक्षाचे ५ हजार ७०० हेक्‍टर तर डाळिंबाचे ११ हजार ३४४ हेक्‍टर क्षेत्र आहे. गेल्यावर्षी दरीबडची, संख, माडग्याळ, अंगलगी, सोन्याळ, आसंगी, तिल्याळ, गोंधळेवाडी, लमाणतांडा, जाडरबोबलाद, सिध्दना, जालिहाळ खुर्द, उटगी परिसरात पावसाचे प्रमाण कमी राहिले. वास्तविक पाहता अवकाळी आणि परतीचा पाऊस या तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात चांगला झाला. परंतु जत पूर्व भागात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही. परिणामी तलाव, विहीरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर डाळिंबाची छाटणी केली आहे. तर द्राक्षाची छाटणी सुरु आहे. सध्या पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे बागा जगविण्यासाठी टॅंकरचा आधार घ्यावा लागत आहे. 

पूर्व भागातील संख, जालिहाळ खुर्द, अंकलगी, सोन्याळ, जाडरबोबलाद परिसरातील शेतकरी मार्च एप्रिल महिन्यापासूनच टॅंकरने बागांना पाणी देत आहेत. गेल्या वर्षीदेखील टॅंकरने पाणी घालून बागा जगविल्या. सध्या पश्‍चिम भागातून पाणी उपलब्ध होत आहे. परंतु हे पाणी पंधरा ते वीस दिवस पुरेल. त्यानंतर कर्नाटक सीमेवरून पाणी आणावे लागणार आहे. मात्र, कोरोना विषाणूमुळे वाहतूक बंदी, सीमा बंदी यामुळे पाणी आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.  टॅंकरचे दर  १२ हजार लिटर ः ३ ते ४ हजार रुपये  ७ हजार लिटर ः १२०० ते १५०० रुपये  ३ हजार लिटर ः ७०० चे १००० रुपये   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com