agriculture news in marathi, water provide through pipe, ratnagiri, maharashtra | Agrowon

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठ्याचा निर्णय

टीम अॅग्रोवन
रविवार, 8 सप्टेंबर 2019

रत्नागिरी  ः केंद्र शासनाच्या ‘हर घर नल से जल’ या योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक घरात पाणी पुरविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. जिल्ह्यातील ८४५ ग्रामपंचायतीअंतर्गत ३ लाख ४७ हजार ९०० ग्राहक असून, आतापर्यंत विविध योजनांमधून १ लाख ७६ हजार ग्राहकांच्या घरांत नळाद्वारे पाणी पुरवण्यात आले आहे. उर्वरित २ लाख २३ हजार ग्राहकांच्या घरातं मार्च २०२४ पर्यंत नळाद्वारे पाणी मिळणार आहे. त्यासाठी कोट्यवधींचा निधी केंद्र शासन देणार आहे. 

रत्नागिरी  ः केंद्र शासनाच्या ‘हर घर नल से जल’ या योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक घरात पाणी पुरविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. जिल्ह्यातील ८४५ ग्रामपंचायतीअंतर्गत ३ लाख ४७ हजार ९०० ग्राहक असून, आतापर्यंत विविध योजनांमधून १ लाख ७६ हजार ग्राहकांच्या घरांत नळाद्वारे पाणी पुरवण्यात आले आहे. उर्वरित २ लाख २३ हजार ग्राहकांच्या घरातं मार्च २०२४ पर्यंत नळाद्वारे पाणी मिळणार आहे. त्यासाठी कोट्यवधींचा निधी केंद्र शासन देणार आहे. 

‘हर घर नल से जल’ ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. काही दिवसांपूर्वी राज्याच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यामध्ये केंद्र शासनाची ही योजना प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येणार असून, त्यादृष्टीने नियोजन करून आराखडे तयार करण्यात यावेत अशा सूचना दिल्या गेल्या. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने पावले उचलली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे पंधराशेहून अधिक गावे आहेत. ८ प्रादेशिक नळपाणी योजना असून, त्याद्वारे पाणीपुरवठा होतो.  

अजूनही धनगरवाड्यांसह अनेक वाड्यांना उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. कोकणातील भौगोलिक क्षेत्राचा विचार करता त्यांना पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. त्यासाठी केंद्राची ही योजना निश्‍चितच उपयुक्त ठरणार आहे. त्या त्या गावांचा आराखडा तयार करून बंधारे बांधणे, नवीन विहिरी खोदणे, पाऊस पाणी संकलन टाकीच्या माध्यमातूनही पाणी योजनांची अंमलबजावणी यामध्ये केली जाणार आहे.

प्रत्येक व्यक्तीला ४० लिटर पाणी हा निकष बदलून तो ५५ लिटर केला आहे. वाढीव लागणारे पाणी लक्षात घेऊनच नियोजन केले जाणार आहे. कोकणासाठी दरडोई खर्च ३ हजार रुपये प्रति व्यक्ती असा निश्‍चित केला होता. तो वाढवून किमान ५ हजार रुपये करावा, अशी मागणी कोकणातील नागरिकांनी केली आहे. वीजपुरवठ्याअभावी योजना अपूर्ण राहत असतील तर त्या ठिकाणी सौरपंपांचाही उपयोग केला जाईल. 


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर कमीऔरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत...
बियाण्यांच्या अडीच हजारांवर तक्रारींची...बीड : उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट...
नांदेड जिल्ह्यासाठी खरीप पीकविमा योजना...नांदेड : जिल्ह्यात यंदासाठी (२०२०-२१) खरीप हंगाम...
सततच्या खंडित वीजपुरवठ्याने माळीनगर...माळीनगर, जि. सोलापूर : वारंवार खंडित...
अत्यावश्यक वेळीच रासायनिक तणनियंत्रक...हिंगोली : ‘‘शेतकऱ्यांनी तणनियंत्रणासाठी केवळ...
सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांत गेल्या...सांगली : जिल्ह्यात मध्यम व लघू ८४ प्रकल्पांची...
कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठ्यासाठी...रत्नागिरी  : अनिश्‍चित पावसाचा हंगाम लक्षात...
`म्हैसाळ’ची कामे १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण...सोलापूर  : म्हैसाळ योजनेतून सांगोला,...
काथ्या उद्योगातून कोकणाच्या विकासाला...नाशिक  : जगात भारत नारळ उत्पादनात आघाडीवर...
बियाणे बदलून देण्याच्या आदेशाची...अकोला  ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीन...
मराठा आरक्षणाबाबत उपसमितीची वरिष्ठ...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या...
शेती नियोजनातून साधावा आर्थिक प्रगतीचा...नागपूर  : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच...
भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीरमुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील...
राज्यात चांगल्या पावसाचा अंदाजभारतीय हवामान शास्त्र विभागाच्या कृषी मोसम...
पुणे जिल्हा परिषदेची मागासवर्गीय...पुणे  : पुणे जिल्ह्यातील मागासवर्गीय...
नगरमध्ये १८ हजार हेक्टरवर उडदाची पेरणीनगर  ः नगर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते २००० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
आरोग्यदायी हिंगआपल्या रोजच्या स्वयंपाकात पदार्थ करताना फोडणीसाठी...
अकोला जिल्ह्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा...अकोला  ः यंदाच्या हंगामात मृग नक्षत्रात...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची संख्या वाढलीजळगाव  ः खानदेशात यंदा रोपवाटिकांची संख्या...