agriculture news in marathi Water of Ratnagiri district Average level 0.14 m | Agrowon

रत्नागिरी जिल्ह्याची पाण्याची सरासरी पातळी ०.१४ मीटर

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

रत्नागिरी ः उन्हाचा कडाका वाढला असून त्याचा परिणाम भूजल पातळीवर होऊ लागला आहे.

रत्नागिरी ः उन्हाचा कडाका वाढला असून त्याचा परिणाम भूजल पातळीवर होऊ लागला आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस आलेल्या अहवालानुसार मागील पाच वर्षांच्या सरासरीनुसार चिपळूण आणि रत्नागिरी तालुक्यातील पाणी पातळीत किरकोळ घट दर्शवते. जिल्ह्याची सरासरी पातळी ०.१४ मीटर इतकी आहे.

यंदा मोसमी पाऊस उशिरापर्यंत राहिल्यामुळे पाणी टंचाईची तीव्रता कमी राहील, असा अंदाज होता. यावर्षी पहिला टँकर उशिराने धावला. अजूनही टँकरची मागणी करणाऱ्या गावांची संख्या कमी आहे. भूजल पातळीसह मे महिन्यापर्यंत टंचाईविषयी अंदाज घेण्यासाठी भूजल विभागाकडून मार्चच्या अखेरीस सर्व्हेक्षण करण्यात आले. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. मागील पाच वर्षातील सरासरी आकडेवारी ०.१४ मीटरने वाढली आहे. 

मार्च २०२१ मध्ये केलेल्या सर्व्हेक्षणात जिल्ह्यातील सरासरी पातळी ६.१० मीटर आहे. टंचाईची तीव्रता कमी राहील, असा अंदाज आहे; मात्र काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार टँकरची गरज भासू शकते. मार्च महिन्यात पारा ३८ ते ४० अंशापर्यंत काही काळ स्थिर होता. एप्रिल महिन्यातही तीच परिस्थिती आहे.

जिल्ह्यात सध्या १२ गावातील १४ वाड्यांमध्ये सहा टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. त्यात रत्नागिरी, खेड, लांजा, चिपळूण आणि मंडणगड तालुक्याचा समावेश आहे. गतवर्षी पाणीपुरवठा करणाऱ्या‍ गावांची संख्या दुप्पट होती.


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...