पुणे जिल्ह्यातील जवळपास सर्व धरणांतून विसर्ग

पुणे जिल्ह्यातील जवळपास सर्व धरणांतून विसर्ग
पुणे जिल्ह्यातील जवळपास सर्व धरणांतून विसर्ग

पुणे : पाणलोटात धुवाधार बरसात सुरूच असल्याने पुणे जिल्ह्यातील जवळपास सर्व धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कुकडी प्रकल्पातील माणिकडोह, पिंपळगाव जोगे (ता. जुन्नर) आणि नीरा नदीच्या खोऱ्यातील नाझरे धरणवगळता उर्वरित सर्वच धरणे ओसंडून वाहत आहेत. भीमा नदीच्या सर्व उपनद्यांना पूर आल्याने भीमा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाण्याचा विसर्ग कायम राहिल्यास उजनी धरण लवकरच भरणार आहे.

जिल्ह्यातील कुकडी, भीमा, घोड, भामा, इंद्रायणी, पवना, मुळा-मुठा, नीरा आणि कानंदी, आरळा, मीना या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे भरली आहेत, धरणसाखळीतून मुठा नदीमध्ये ४५ हजार क्युसेकपेक्षा अधिक पाणी सोडण्यात आले आहे, तर पवना आणि मुळशी धरणातूनही मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने मुळा-मुठा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. बंडगार्डन बंधाऱ्याजवळ मुळा-मुठा नदीत १ लाख २३ हजार ४७२ क्युसेक वेगाने पाणी वाहत आहेत, तर दौंड येथील नदीपात्रात २ लाख १२ हजार ९६, क्युसेक वेगाने पाणी वाहत असल्याने भीमा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. वीर धरणाणतून सुमारे एक लाख क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात अाल्याने नीरा नदी इशारा पातळीवर पोचली आहे. 

सोमवारी (ता. ५) दुपारी १२ वाजता जिल्ह्यातील धरणांमधून सुरू असलेला विसर्ग (क्युसेकमध्ये) : टेमघर ७१२, वरसगाव ६ हजार ७७०, पानशेत ९ हजार ८९२, खडकवासला ४५ हजार ४७४, पवना १८ हजार ४००, कासारसाई ८००, मुळशी ३४ हजार, कलमोडी ७ हजार ७९९, चासकमान २१ हजार ३५०, भामा आसखेड १८ हजार २५७, आंद्रा ४ हजार १३६, वडिवळे ७ हजार ७८३, गुंजवणी ३ हजार २००, भाटघर ३१ हजार ५८३, नीरा देवघर ११ हजार ५७१, वीर १ लाख २ हजार ५५५, येडगाव १६ हजार १००, वडज २ हजार ९७३, डिंभे २० हजार, चिल्हेवाडी ७ हजार २९२, घोड ५२ हजार ९८०, उजनी १० हजार.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com