सातारा जिल्ह्यातील जवळपास सर्व धरणांतून विसर्ग

 जिल्ह्यातील जवळपास सर्व धरणांतून विसर्ग
जिल्ह्यातील जवळपास सर्व धरणांतून विसर्ग

सातारा ः जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने या सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राज्याच्या विजेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कोयना धरणातून पावसाचा जोर कायम असल्याने एक लाख तीन हजार ६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

पावसाचा जोर वाढत असल्याने धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा पाणीसाठा नियंत्रित राहण्यासाठी धरण व्यवस्थापनाकडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस अजून कमी झालेला नसल्याने धरण व्यवस्थापनाकडून पाण्याचा विसर्ग वाढवला जात आहे. कोयना धरणातून पहाटे पाच वाजता ८२ हजार ६५१ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. 

पाण्याची आवक वाढ असल्याने पाण्याचा विसर्ग टप्पाटप्याने वाढ करण्यात आली आहे. सकाळी सात वाजता ९० हजार क्युसेक करण्यात आला. त्यानंतर साडेदहा वाजता ९७ हजार ९३५ क्युसेक करण्यात आला होता. दुपारी एक वाजता पुन्हा एक लाख तीन हजार ६०० क्युसेक करण्यात आला होता. हा विसर्ग तीन वाजेपर्यंत कायम होता. मात्र, पाण्याची आवक वाढत असल्याने सहा वाजता विसर्गात वाढ केली जाणार आहे. 

कोयना धरणात सोमवारी दुपारी तीन पर्यंत ९९.७४ टीएमसी म्हणजेच ९४.६४ टक्के धरण भरले आहे. धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी व धोम-बलकवडी धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आले आहे. यामध्ये धोम १८,०४६, कण्हेर १६,७६५, उरमोडी २,८१४, तारळी ८,९५३ व धोम-बलकवडी धरणांतून ५,११२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

या सहा प्रमुख धरणांतून एक लाख ५० हजार २९० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्याच्या पाणीपातळी वाढली असल्याने नदी काठच्या गावात तसेच शेतातील अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com