agriculture news in Marathi water release from dams in Khandesh Maharashtra | Page 2 ||| Agrowon

खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घट

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

 गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार किंवा अतिजोरदार पाऊस झालेला नाही. धरणांच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये पाऊस नसल्याने धरणांमधील पाण्याची आवक कमी झाली आहे. 

जळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार किंवा अतिजोरदार पाऊस झालेला नाही. धरणांच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये पाऊस नसल्याने धरणांमधील पाण्याची आवक कमी झाली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील गिरणा, वाघूर, हतनूर, धुळ्यातील अनेर, पांझरा, कनोली आदी प्रकल्पांमधील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. 

तापी नदीवरील भुसावळ नजीकच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस थांबला आहे. मध्य प्रदेशात तापी नदीचा उगम आहे. तसेच या नदीला पूर्णा, भोगावती, मोर, सूर, गिरणा, अंजनी आदी नद्या येऊन मिळतात. पाऊस थांबल्याने या सर्वच नद्यांमधील पाण्याची आवक कमी झाली आहे. यामुळे तापी नदीचा पूर ओसरला आहे. हतनूर प्रकल्पाचे १२ दरवाजे सोमवारी उघडे होते. सध्या चार दरवाजांव्दारे विसर्ग सुरू आहे. जामनेरातील वाघूर नदीचे पाणलोट क्षेत्र औरंगाबाद-चाळीसगावनजीकच्या सातमाळा पर्वत, अजिंठा डोंगररांगांमध्ये आहे. 

या भागातील पाऊसही बंद आहे. यामुळे वाघूर प्रकल्पातील आवक घटली आहे. वाघूर प्रकल्पातून सध्या कुठलाही विसर्ग सुरू नसल्याची माहिती मिळाली. चाळीसगाव व नाशिक जिल्ह्याच्या सीमेवरील गिरणा धरणाचे पाणलोट क्षेत्र गुजरातमधील सापुतारा, मालेगाव आदी भागात आहे. या नदीवरील नाशिक जिल्ह्यातील चणकापूर, ठेंगोडा, केळझर आदी लहान-मोठ्या प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग बंद झाला आहे. या प्रकल्पांमधून पाणी थेट पुढे गिरणा धरणात येते. गिरणा धरणातील आवकही कमी झाली असून, यामुळे धरणातील विसर्ग बंद करण्यात आला आहे.

गिरणा नदीला प्रवाह
गिरणा नदीला सध्या बऱ्यापैकी प्रवाही पाणी आहे. नदीत मन्याड लघू प्रकल्पातून पाणी येत आहे. तसेच पाचोरामधील लघू प्रकल्पांच्या सांडव्याचे पाणीदेखील गिरणा नदीत येत आहे. यामुळे गिरणा नदीत सध्या बऱ्यापैकी पाण्याचा प्रवाह आहे. धुळ्यातील पांझरा (ता.साक्री), अनेर (ता.शिरपूर), कनोली (ता.धुळे), मालनगाव या प्रकल्पांमधील विसर्गही कमी झाला आहे. अनेर धरणातून दोन दरवाज्यांव्दारे विसर्ग सुरू  असल्याची माहिती मिळाली.


इतर अॅग्रो विशेष
पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांवर सातत्याने...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा दणका पुणे ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोकणातही...
‘जीआय’प्राप्त शेतकरी ‘वापरकर्ते’ करणारपुणे: राज्यातील पिकांना भौगोलिक निर्देशांक मिळाले...
तीन दिवसांत मदतीबाबत निर्णय: मुख्यमंत्रीसोलापूर ः हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस...
राज्यात पावसासाठी पोषक स्थिती पुणे ः बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्रप्रदेश...
शेतकऱ्यांना मदतीसाठी कर्जाशिवाय गत्यंतर...तुळजापूर, जि. उस्मानाबाद: स्थानिक लोकांशी...
कोरोनामुळे वाढल्या कृषी व्यापार संधीचीनच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची...
कृषी ‘समृद्धी’चा मार्गबाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत...
अकोले तालुक्यात होतेय डांगी गोवंशाचे...अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति...
सोशल मिडीयावर ‘#ओला_दुष्काळ’ ट्रेंडनांदेड : राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर...
`समृद्धी`वर उभारणार गोदामे, शीतगृहे पुणेः मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना शेतमाल...
पुण्यातील फूल बाजाराच्या कामाला गती पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने...
राज्यात ठिकठिकणी जोरदार पाऊस पुणेः राज्यातील पावसाचा प्रभाव कमी...
केळी निर्यातीसाठी ‘बनानानेट’च्या...नागपूर: राज्यातून केळीची निर्यात वाढल्यानंतर आता...
देशातील सूतगिरण्या ९५ टक्के क्षमतेने...जळगाव ः देशातील सुमारे ७१५ सूतगिरण्या ९५ टक्के...
जिल्हानिहाय ऑनलाइन निविष्ठा परवाने वाटप...पुणे: राज्यात खते, बियाणे व कीडनाशकांच्या...
ओतूरमध्ये कांद्याला किलोला कमाल ८०...पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर बाजार समितीच्या...
जोरदार पावसाचा अंदाज पुणे ः राज्यात पुढील पाच ते सहा दिवस काही ठिकाणी...
राज्यांचा निर्धार नि केंद्राची माघार‘जीएसटी’ अंतर्गत राज्यांना द्यावयाच्या...
भुकेला भारतजागतिक भूक निर्देशांक-२०२० नुकताच प्रसिद्ध झाला...