agriculture news in Marathi, water release form jaykwadi, Maharashtra | Agrowon

जायकवाडी उजव्या कालव्यातून पाण्याच्या विसर्गास प्रारंभ
टीम अॅग्रोवन
रविवार, 11 ऑगस्ट 2019

पैठण, जि. औरंगाबाद : सुरू असलेल्या आवकेमुळे जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत वाढ सुरूच आहे. त्यामुळे शनिवारी (ता. १०) दुपारी १ वाजताच्या सुमारास धरणाचा एकूण पाणीसाठा २३७७.६३५ दलघमी (८३.९४ टीएमसी) झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता. ९) धरणाच्या उजव्या कालव्यातून ४०० क्‍युसेक पाणी माजलगाव धरणाच्या दिशेने सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग आजही सुरूच होता. 

पैठण, जि. औरंगाबाद : सुरू असलेल्या आवकेमुळे जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत वाढ सुरूच आहे. त्यामुळे शनिवारी (ता. १०) दुपारी १ वाजताच्या सुमारास धरणाचा एकूण पाणीसाठा २३७७.६३५ दलघमी (८३.९४ टीएमसी) झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता. ९) धरणाच्या उजव्या कालव्यातून ४०० क्‍युसेक पाणी माजलगाव धरणाच्या दिशेने सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग आजही सुरूच होता. 

धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे पहिल्यांदाच हे पाणी सोडण्यात आले आहे. वाढत असलेल्या पाणीसाठ्यामुळे धरणाला  तहसीलदार महेश सावंत, पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली होती. त्यामध्ये पोलिस सुरक्षा व पाणीपातळी नियोजनाची माहिती घेऊन सूचना देण्यात आल्या. या वेळी धरण नियंत्रण कक्षातील कनिष्ठ अभियंता अनिकेत हसबनीस, बबन बोधणे यांनी पाणीपातळीची माहिती त्यांना दिली होती. पाहणीवेळी धरणात सकाळी पाण्याची आवक ३० हजार क्‍युसेकने होती. 

शुक्रवारी दिवसभरात आवक कमी-अधिक वाढ झाली असली, तरी रात्रीतून पाण्याची आवक वाढण्याची शक्‍यता जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली होती. दरम्यान, शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास जायकवाडीत ३१४२७ क्‍युसेकने पाण्याची आवक सुरू होती. जायकवाडीतील जीवंत पाणीसाठा १६३९.५२९ दलघमीवर (५७.८८ टीएमसी)  पोहोचला होता. सोबत उजव्या कालव्यातून ४०० क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरूच होता. उजव्या कालव्यात सोडण्यात आलेल्या पाण्याप्रमाणे डाव्या कालव्यातही पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

इतर अॅग्रो विशेष
खानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव  ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...
नाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक  : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...
शेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...
दसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...
ठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...
पाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...
मज चंद्र हवास्थळ बंगळूर, सात सप्टेंबरची मध्यरात्र, वेळ १...
विविधतेतच एकताहिंदी भाषा दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित...
एकत्रित प्रयत्नांमधून झाले लष्करी अळी...नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाने...
पुरंदर, सासवडच्या सीताफळांची परराज्यात...पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवडचे नाव काढताच...
कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ....पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे...
जल ‘अ’नीतीया वर्षी महापूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्यांचा...
‘लष्करी अळी’बाबत सरकार उदासीनच!देशातील वीसपेक्षा जास्त राज्यांमध्ये आणि एक कोटी...
मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने...औरंगाबाद : आधी दुष्काळ मग खरिपातील चारा पिकांवर...
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात ...नागपूर : शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत...
आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर कडदे...पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कडदे येथील...
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...
विविधरंगी फुले, फीलर्सला गणेशोत्सवात...फुलांना वर्षभर मागणी राहते. मात्र, वर्षांतील काही...